Wednesday, June 6, 2018

‘फर्जंद’ चित्रपटाला रसिकांचा दमदार प्रतिसाद


चित्रपटगृहात घुमतोय ‘जय भवानीजय शिवाजीचा जयघोष

कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या फर्जंद या सिनेमाचं सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे. फर्जंद चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मुंबईपुणे व इतर शहरामध्ये दमदार ओपनिंग मिळाले असून प्रेक्षकांचा ओघ सतत सुरू आहे. स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपीची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या फर्जंदचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधवमहेश जाऊरकरस्वप्नील पोतदार आहेत.
चित्रपटाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद. ही भूमिका अंकित मोहन या कलाकाराने साकारली आहे. सर्व कलाकारांचे अप्रतिम अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर 'हाउस फुल्लकलेक्शन करीत सुपरहिट चित्रपटाचा मान फर्जंदने पटकावला आहे. बऱ्याच शहरांत प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ‘फर्जंद’चे शोज् वाढवले गेलेत. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर व समीक्षकांनीही ‘फर्जंद’ला पसंतीची पावती दिली आहे.
रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच, ‘’चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान’’ ही व्यक्त केले. चित्रपटगृहात ‘जय भवानीजय शिवाजीचा जयघोष करीत सर्व चित्रपटगृहे ‘फर्जंद’मय झालेली पाहायला मिळत आहेत. फर्जंद सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर कलाकृती पाहिल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे. सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्यांच्या ओठांवर फर्जंदचेच गुणगान आहे. सर्वजण सिनेमातील संवादांपासून-गाण्यांपर्यंत आणि अभिनय, अॅक्शनपासून-व्हिएफएक्सपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कौतुक करत आहेत.
रसिक-प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या फर्जंदची घौडदौड मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

No comments:

Post a Comment