Thursday, May 31, 2018

भारत ही किवींसाठी उत्तम उदयोन्मुख बाजारपेठ: झेस्प्री इंटरनॅशनल



मुंबई, 28 मे 2018: न्यूझीलंडमधील झेस्प्री इंटरनॅशनल लिमिटेड या जगातील सर्वात मोठ्या किविफ्रुट मार्केटरने भारतातील स्थान बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या, हा ब्रँड अमेरिका, जर्मनी, स्पेन, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यासह 59 हून अधिक देशांना किविफ्रुट्स निर्यात करतो. उदयोन्मुख देशांमध्ये भारत सध्या आघाडीवर असून, ब्रँडचा तेथे सर्वाधिक बाजारहिस्सा आहे.

भारतात अंदाजे एक दशक कार्यरत असलेल्या झेस्प्री इंटरनॅशनलने 2018 मध्ये निर्यातीमध्ये वाढ करून बाजारहिस्सा वाढवण्याचे ठरवले आहे. ब्रँडची या वर्षीची पहिली शिपमेंट न्यूझीलंड या उत्कृष्ट दर्जाच्या किविफर्ट उत्पादनासाठी जगभर लोकप्रिय असलेल्या देशातून भारतात पोहोचली आहे. झेस्प्री इंटरनॅशनल भारताला करत असलेल्या निर्यातीमध्ये सहसा झेस्प्री ग्रीन किविफ्रुट व झेस्प्री सनगोल्ड किविफ्रुट यांचा समावेश असतोपरंतु, या वर्षी या दोन्ही प्रकारांच्या जम्बो आकारातील प्रकारांचीही निर्यात केली जाणार आहे. गेला दशकभर झेस्प्री ग्रीन किविफ्रुटची निर्यात केली जात असून, तरझेस्प्री सनगोल्ड किविफ्रुट गेल्या तीन वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. 

किवी ज्या प्रकारे दिसते व त्यामध्ये जे पोषक घटक आहेत, ते विचारात घेता किवी हे असामान्य फळ आहे. झेस्प्री ग्रीन किविफ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी, डाएटरी फायबर्स व अँटिऑक्सिडंट्स यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच,  pH मूल्य कमी असल्याने, साठवणुकीच्या वेळी त्यातील व्हिटॅमिन नाहीशी होत नाहीत. झेस्प्री सनगोल्ड किविफ्रुटची चव गोड असते. या फळाचा आकार नेहमी एकसमान व सुंदर असतो आणि हे फळ व्हिटॅमिन सी, डाएटरी फायबर्स, फॉलेट, मिनरल्स व अँटिऑक्सिडंट्स यांचा समृद्ध स्रोत आहे. यामुळेच ते पोषकद्रव्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या फळांपैकी एक आहे. ब्रेकफास्ट केल्यावर किविफ्रुट खाल्याने समाधान वाटते, तसेच पचनासाठी मदत होते व पोट फुगल्यासारखे वाटण्याचे प्रमाण कमी होते.

झेस्प्री इंटरनॅशनल न्यूझीलंडमधील उत्पादकांच्या थेट मदतीने जगभर सर्वोत्कृष्ट दर्जाची फळे उपलब्ध करते. फळातील ब्रिक्स पातळीची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी उत्पादक किविफ्रुटची सतत चाचणी करतात. ब्रिक्स पातळी जितकी अधिक असेल तितके फळ चांगले असते. आदर्श ब्रिक्स पातळी साध्य केल्यावरच उत्पादकाला फळाच्या हार्वेस्टची परवानगी दिली जाते. यामुळे, सर्व किविफ्रुटमध्ये चवीचे सर्वोच्च मापदंड पाळले जाते. नावीन्यपूर्ण ऑर्कर्ड पद्धतींवर संशोधन करण्यासाठी आणि उत्तम गुणधर्म असलेल्या, सातत्यपूर्ण, दर्जेदार चवीच्या झेस्प्री किविफ्रुटची निर्मिती करण्याच्या दृष्टीने ऑर्कर्ड व्यवस्थापन पद्धती उपलब्ध करण्यासाठी झेस्प्री इंटरनॅशनल उत्पादकांबरोबरही सहयोग करते.

भारतात फळांचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो. परंतु, शहरी वर्गामध्ये होणारी वाढ, विविध देशांच्या संस्कृतीशी होणारी ओळख व आरोग्याबाबत जागृत व्यक्तींच्या संख्येत होणारी वाढ, यामुळे परदेशी फळांना असलेली मागणीही वाढत आहे. सर्व परदेशी फळांमध्ये किवीने झपाट्याने वाढ साधली असून, एकत्रित वार्षिक वाढीचा दर 80-100% नोंदवला आहे.

या आठवड्यापासून भारतातील सर्व प्रमुख रिटेल दुकाने व घाऊक बाजारांत झेस्प्री ग्रीन किविफ्रुट आणि झेस्प्री सनगोल्ड किविफ्रुट उपलब्ध होतील.

झेस्प्री इंटरनॅशनल लिमिटेडविषयी

झेस्प्री इंटरनॅशनल लिमिटेड ही किविफ्रुटचे मार्केटिंग करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असून, 59 हून अधिक देशांत किविफ्रुटची विक्री करत आहे व जगातील व्हॉल्युममध्ये 30 टक्के योगदान देत आहे. 2016/17 मध्ये झेस्प्रीने प्रीमिअम गुणवत्तेच्या झेस्प्री किविफ्रुटच्या 137 दशलक्ष ट्रेची विक्री केली. झेस्प्री ब्रँडच्या माध्यमातून, झेस्प्रीने खात्रीशीर उत्कृष्ट व स्वादिष्ट, पोषक किविफ्रुटसाठी जागतिक बेंचमार्क निर्माण केला आहे. उत्कृष्ट दर्जाची झेस्प्री किविफ्रुट संपादित करण्यासाठी व आपल्या वितरण भागीदारांद्वारे घाऊक बाजार व रिटेल ग्राहक यांना किविफ्रुटचा पुरवठा करण्यासाठी झेस्प्री उत्पादक व पोस्ट-हार्वेस्ट ऑपरेटर यांच्याबरोबर काम करते. झेस्प्रीची जागतिक मुख्यालये न्यूझीलंडमधील माउंट मानगॅन्युइ येथे, न्यूझीलंडमधील बे ऑफ प्लेंटी या सर्वात मोठ्या किविफ्रुट उत्पादक प्रदेशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. जगातील 21 देशांत झेस्प्रीची कार्यालये आहेत. जगातील किविफ्रुटच्या व्यापारातील एक तृतियांश व्यापार झेस्प्री करत आहे.

No comments:

Post a Comment