Friday, April 27, 2018

१८ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर


नाटकदूरचित्रवाहिन्यांवरील मालिकावृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.
चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, मांजा आणि कॉपी या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. नाटक विभागातील नामांकन यादीत वेलकम जिंदगी’, ‘माकड’, ‘संगीत देवबाभळी’, अनन्या’, ‘अशी ही श्यामची आई या नाटकांचा समावेश आहे. मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात कुलस्वामिनी’, ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लेक माझी लाडकी अशा एकूण ५ मालिकेंमध्ये चुरशीची लढत रंगली आहे.
याबरोबरच लेखकविनोदी अभिनेताविनोदी अभिनेत्रीसाहाय्यक अभिनेत्रीबालकलाकार साहाय्यक अभिनेताप्रकाशनेपथ्यसंगीत,पार्श्वसंगीतरंगभूषालक्षवेधी नाटक आणि लक्षवेधी चित्रपट तसेच न्यूज चॅनल आदी गटांतही नामांकने जाहीर झाली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. 
चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट – नशीबवान फ्लाईंग (गॅाड फिल्म्स), रेडू (नवल फिल्म्स),  पळशिची पिटी ( ग्रीन प्रोडक्शन), मांजा (इंडिया स्टोरीज प्रा.लि), कॉपी (श्री महालक्ष्मी क्रिएशन्स कंपनी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – प्रतीक लाड (कॉपी)अथर्व बेडेकर (अंड्याचा फंडा)यश कुलकर्णी (घाट)श्रद्धा सावंत (कॉपी)वैष्णवी तांगडे (क्षितीज)
लक्षवेधी चित्रपट – कच्चा लिंबू   (टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन्स)
स्पेशल ज्युरी पुरस्कार  मुरांबा  (दशमी स्टुडीओ)
प्रथम पदार्पण पुरस्कार - प्रसाद ओक ( कच्चा लिंबू)विक्रम फडणीस (हृद्यांतर)सागर वंजारी (रेडू)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी)दयासागर वानखेडे (कॉपी)प्रसाद ओक (कच्चा लिंबू)अमोल गोळे (नशीबवान),जतिन वागळे (मांजा)
सर्वोत्कृष्ट कथा - दयासागर वानखेडे (कॉपी)धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी)संजय जगताप (करार)
सर्वोत्कृष्ट पटकथा- जतिन वागळे (मांजा)योगेश जोशी (गच्ची)अमोल गोळे (नशीबवान),
सर्वोत्कृष्ट संवाद  हर्षवर्धन (मंत्र)दयासागर वानखेडे (कॉपी)उपेंद्र शिधये (मांजा),
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रवी जाधव (कच्चा लिंबू)सुमेध मुधगलकर (मांजा)भालचंद्र (भाऊ) कदम (नशीबवान)निलेश बोरसे( बंदुक्या),वैभव तत्ववादी (भेटली तू पुन्हा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), पूजा सावंत (भेटली तू पुन्हा)किरण ढाणे (पळशिची पिटी)सोनाली कुलकर्णी (तुला कळणार नाही)दीपा परब (अंड्याचा फंडा )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (बंदूक्या)राहुल बेलापुलकर (पळशिची पिटी)नामदेव मुरकुटे (बंदूक्या)मिलिंद शिंदे (कॉपी),अंशुमन विचारे (कॉपी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आश्विनी भावे (मांजा) छाया कदम (रेडू)शिल्पा तुळसकर (बॉइज)प्राजक्ता माळी (हंपी)क्रांती रेडकर (करार),
सर्वोत्कृष्ट संकलन  संदिप जंगम (पळशिची पिटी)चारुश्री रॉंय (मांजा)संजय इंगळे (कॉपी),
सर्वोत्कृष्ट छायांकन-  फसाहत खान (मांजा),मंगेश गाडेकर (रेडू)संजय मेमाणे (नदी वाहते),
सर्वोत्कृष्ट संगीत  अमर राम लक्ष्मण (अॅट्रॅासिटी)अविनाश विश्वजीत (मंत्र)निलेश मोहरीर (तुला कळणार नाही)अवधूत गुप्ते (बॉइज)ऐ. व्ही प्रफुलचंद् (झाला बोभाटा),
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - रुपाली मोघे (हंपी)नेहा राजपाल (तुला कळणार नाही)वैशाली सामंत (अॅट्रॅासिटी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक  अजय गोगावले (रेडू)स्वप्निल बांदोडकर (तुला कळणार नाही)अवधूत गुप्ते (बॉइज),
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट  नाटक  -वेलकम जिंदगी (त्रिकुट)माकड (श्री स्वामी समर्थ आर्ट्स)संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रोडक्शन्स), अनन्या (सुधीर भट प्रोडक्शन्स)अशी ही श्यामची आई (सुधीर भट प्रोडक्शन्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजन ताम्हाणे (वेलकम जिंदगी)अभिजित झुंझारराव (माकड ),प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी)प्रताप फड (अनन्या)स्वप्निल बारस्कर (अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट लेखक – चैतन्य सरदेशपांडे (माकड)प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी)प्रताप फड (अनन्या)अनिल काकडे (फायनल डिसिजन )स्वप्निल बारस्कर ( अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट अभिनेता  भरत जाधव (वेलकम जिंदगी)चैतन्य सरदेशपांडे (माकड)मकरंद अनासपुरे (उलट सुलट )दिलीप घारे (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी )ओमप्रकाश शिंदे (अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  किरण खोजे (ढाई अक्षर प्रेम के)मानसी जोशी (संगीत देवबाभळी) श्रृजा प्रभूदेसाई (तोच परत आलाय)ऋतुजा बागवे (अनन्या)शुभांगी सदावर्ते (संगीत देवबाभळी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – प्रसाद पंडित (फायनल डिसिजन)दिपक करंजीकर (अर्ध सत्य)गिरीश ओक (वेलकम जिंदगी) , प्रमोद पवार (अनन्या)सिद्धार्थ बोडके (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री  शिवानी रांगोळे (वेलकम जिंदगी)अनघा भगरे (अनन्या)प्रियांका हांडे (हम पांच)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना  भूषण देसाई (अनन्या)कुमार सोहनी (अर्ध सत्य)प्रफुल्ल दिक्षित (संगीत देवबाभळी)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – संदेश बेंद्रे (अनन्या)संदेश बेंद्रे (संगीत शंकरा),  प्रसाद वालावलकर (अशी ही श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट संगीत -  आनंद ओक (संगीत देवबाभळी), नरेद्र भिडे (संगीत शंकरा) आमिर हडकर (दिल तो बच्चा है जी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - तृप्ती झुंझारराव (माकड )विजय भोईगडे (अनन्या)चैत्राली डोंगरे (वेलकम जिंदगी)
लक्षवेधी अभिनेता – अतुल पेठे ( समाजस्वास्थ)अमोल कोल्हे (अर्ध सत्य)अजय पुरकर (ढाई अक्षर प्रेम के)
लक्षवेधी अभिनेत्री  भारती पाटील (एक्सक्युजमी)अतिशा नाईक (अशी ही श्यामची आई)सुलेखा तळवलकर (९ कोटी ५७ लाख)
लक्षवेधी नाटक - (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी )
विनोदी अभिनेता – वैभव पिसाट (हम पांच),संतोष पवार (अंदाज आपला आपला ) आनंद इंगळे (९ कोटी ५७ लाख)पंढरीनाथ कांबळे (दिल तो बच्चा है जी) किशोर चौघुले (शुभ दंगल सावधान)
विनोदी अभिनेत्री – पौर्णिमा अहिरकेंडे (अशी ही श्यामची आई),वनिता खरात (हम पांच) माधवी गोगटे (अंदाज आपला आपला ),चेतना भट( शुभ दंगल सावधान)पूर्वा कौशिक (हम पांच),
मालिका
सर्वोत्कृष्ट मालिका – कुलस्वामिनी (स्टार प्रवाह),  सरस्वती (कलर्स मराठी)नकळत सारे घडले (स्टार प्रवाह)राधा प्रेम रंगी रंगली (स्टार प्रवाह)लेक माझी लाडकी स्टार प्रवाह)
लक्षवेधी मालिका - विठू माऊली (स्टार प्रवाह)बाप माणूस (झी युवा )सरस्वती (कलर्स मराठी )
सर्वोत्कृष्ट अभिनेता  हरिश दुधाडे (नकळत  सारे घडले ),संग्राम साळवी (कुलस्वामिनी)अजिंक्य राऊत (विठु माऊली)सचित पाटील ( राधा प्रेम रंगी रंगली ) आशुतोष कुलकर्णी (लेक माझी लाडकी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  तितिक्षा तावडे (सरस्वती) पल्लवी पाटील (बापमाणूस), नुपूर परुळेकर (नकळत सारे घडले )सुपर्णा श्याम (दुहेरी)विणा जगताप (राधा प्रेम रंगी रंगली)
सहाय्यक अभिनेता  शैलेश दातार (राधा प्रेम रंगी रंगली)सुदेश म्हशीलकर (नकळत सारे घडले)सुनिल तावडे (दुहेरी)गिरीश ओक (कुलस्वामिनी)मिलिंद शिंदे (सरस्वती)
सहाय्यक अभिनेत्री  कविता लाड (राधा प्रेम रंगी रंगली)निविदेता सराफ (दुहेरी)सुरेखा कुडची (नकळत सारे घडले )किशोरी आंबिये (कुलस्वामिनी), पूजा कटुरडे (विठू माऊली)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अजित  कुमार (दुहेरी )गिरीश वसईकर (कुलस्वामिनी)निरंजन पत्की (नकळत सारे घडले),  उमेश नामजोशी (लेक माझी लाडकी )अविनाश  वाघमारे (विठू माऊली)
कथाबाह्य मालिका घोषित – द रिअल हिरो - कथा समृद्धीच्या (झी मराठी)
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल
ए.बी.पी माझा टी व्ही ९ मराठीन्यूज १८ लोकमत,  झी २४ तास जय महाराष्ट्र
पुरुष सुत्रधार - विनोद घाडगे (ए.बी.पी माझा)विराज मुळ्ये (न्यूज १८ लोकमत)कपिल देशपांडे  (झी २४ तास)
स्त्री सुत्रधार -  सोनाली माने (ए.बी.पी माझा)प्राची वैद्य (टी व्ही ९ मराठी)चैत्राली (न्यूज१८ लोकमत)
रेडिओ पुरस्कार  ९८ .३ रेडिओ मिर्ची ९२.७  बिग एफ .एम., ९१.१ रेडिओ सिटी
चित्रपट विभागासाठी शिवाजी लोटन पाटील अभिजित पानसेप्रमोद पवार,अमृता रावमनोहर सरवणकरसमृद्धी पोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाटय़ परीक्षण विभागातील संजय डहाळेप्रकाश निमकरप्राजक्ता कुलकर्णी यांनी यंदाच्या नाटय़स्पर्धेच्यापरीक्षणाची धुरा सांभाळली होती. टी.व्ही विभागासाठी कल्पना सावंत,  रेखा सहायनितीन कुमार तर न्यूज चॅनल विभागासाठी अर्चना नेवरेकर, चंद्रशेखर सांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यंदाचा १८ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा रविवार ६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता  जोगेश्वरी येथील कमालीस्थान स्टुडिओ (कमल अमरोही) जे .व्ही एल आर येथे रंगणार आहे.

No comments:

Post a Comment