Wednesday, April 25, 2018

लीभेर इंडिया पश्चिम भारतात विस्तार करणार



-          मे 2018 मध्ये नवे रेफ्रिजरेटर्स दाखल केल्यानंतर पश्चिम भारतातून अंदाजे 35% योगदान मिळण्याची या जर्मन रेफ्रिजरेटरची अपेक्षा 
मुंबईएप्रिल 18, 2018 जगभरातील रेफ्रिजरेटर बाजारात प्रभुत्व मिळवल्यानंतर, लीभेर ही जर्मनीतील रेफ्रिजरेटर तज्ज्ञ कंपनी भारतात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे आणि प्रगतीला चालना देण्यासाठी पश्चिम भारतावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. औरंगाबाद येथे उत्पादन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करणाऱ्या कंपनीने सध्या एकूण विक्रीपैकी 35% हून अधिक विक्री पश्चिम भागातून करायचे ठरवले आहे आणि आगामी वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याची योजना आखली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर बाजारपेठ हस्तगत करण्याची आकांक्षा असलेल्या लीभेर या रेफ्रिजरेटर क्षेत्रातील जर्मन कंपनीने पश्चिम भारतातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सुरत, राजकोट, बडोदा या शहरांत सिटी डीलरचे जाळे 40ने वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करून, व्यवसायाच्या विस्ताराचे नियोजन जाहीर केले आहे. कंपनीने पश्चिम भारतातील शहरांतील मुख्य डीलर व रिटेल चेन यांच्याशी भागीदारी करायचे ठरवले आहे आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात प्रीमिअम रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करायचे जाहीर केले आहे. तेथे कार्य सुरू करण्यासाठी कंपनीने अगोदरच अंदाजे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
विस्तार योजनेविषयी बोलताना, लीभेर अप्लायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ सेल्स ऑफिसर राधाकृष्ण सोमायजी यांनी सांगितले, पश्चिम भारतात विस्तार करण्याची घोषणा करत असल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे आणि देशातील शहरी व निम-शहरी भागांत आगामी रेफ्रिजरेटर्सची विक्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. एक बाजारपेठ म्हणून आमच्या दृष्टीने पश्चिम भारतात मोठी क्षमता आहे, असे आम्हाला वाटते. तसेच, पश्चिमेकडील राज्यांतील किंमत विचारात घेता, चांगली बाजारपेठ मिळवता येईल, असा विश्वास आहे. ग्राहकांसाठी आमची उत्पादने व सेवा सहज उपलब्ध करण्यास मदत होण्यासाठी आम्ही नव्या डीलरशिप, शाखा व अधिकृत सेवा केंद्रे याद्वारे आमचे जाळे झपाट्याने विस्तारत आहोत. आम्ही रेफ्रिजरेटर उत्पादनांमध्ये विस्तार करून व्यवसायाचा विस्तार व वाढ करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आमच्या काही प्रकल्पांमध्ये आम्ही विशिष्ट नियोजन केले आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे व आगामी काळात गुंतवणूक करण्याचे आमचे प्रयत्न असणार आहेत. हे नियोजन मूलभूत क्षमतेसाठी आहेत, तसेच नवी उत्पादने दाखल करण्यावरही आम्ही भर देणार आहोत. आम्ही आमचे सक्षम ब्रँड, वैविध्यपूर्ण उत्पादने, उत्तम गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत व जागतिक जाळे यांचा वापर विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी करणार आहोत.
मेट्रो व अन्य कनेक्टिविटी विकसित होत असल्याने महानगरे व टिअर-I/II शहरांतून जास्तीत जास्त मागणी येईल, असा कंपनीचा अंदाज आहे. मास प्रीमिअम श्रेणीला लक्ष्य करणाऱ्या लीभेर अप्लायन्सेस इंडियाने भारतीय बाजाराच्या गरजा विचारात घेऊन अतिशय दर्जेदार रेफ्रिजरेशन अप्लायन्सेसचे उत्पादन करायचे उद्दिष्ट ठरवले असून, या प्रकल्पात 2018 पासून दर वर्षी अंदाजे 500,000 कूलिंग अप्लायन्सेसची निर्मिती करायची क्षमता आहे.
2016 या वर्षात समूहाची एकूण उलाढाल 9.2 अब्ज युरो असलेल्या लीभेर समूहाने 2018 मधील आगामी महिन्यांमध्ये नवी रेफ्रिजरेटर उत्पादने निर्माण करायचे नियोजन केले आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांना सेवा देण्यासाठी विविध रंग व वैशिष्ट्ये यांची सांगड घातलेली 19 रेफ्रिजरेटर मॉडेल दाखल करायचे ठरवले आहे. 2019 मध्ये कंपनीने अंदाजे 22 मॉडेल दाखल करायची योजना आखली आहे, तसेच टप्प्याटप्प्याने उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी पुढील 3 वर्षांमध्ये प्रगत तंत्रज्ञान असलेली आणखी 11 मॉडेल दाखल केली जाणार आहेत. लीभेर भारतात 2008 पासून कार्यरत आहे. कंपनीने देशांतर्गत रेफ्रिजरेटर व फ्रीझर बाजारात बिल्ट-इन रेफ्रिजरेटर व फ्रीझर, विविध कूलिंग झोन असलेले साइड बाय अप्लायन्सेस, विशेष वाइन कॅबिनेट, अंडर काउंटर फ्रिज व फ्रीझर्स अशी अनेक उत्पादने दाखल केली आहेत, तसेच कंपनीचे असंख्य एचएनआय ग्राहक आहेत.

No comments:

Post a Comment