मुंबई, १० मार्च २०१८ : साईनील क्रिएशन प्रस्तुत करीत ‘फ़्रेंडशिप बँड’ एक थरारपट. सचिन नरेश घाग लेखित या चित्रपटाची ही कथा वैद्यकीयमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भोवती फिरते. वैद्यकीय प्रवेश चाचणी (सीईटी)चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेतात. आणि मेडिकलकॉलेजात त्यांचा मित्रांचा एक ग्रुप तयार होतो. कालांतराने त्यांच्यात एक मैत्रीचा बंध जुळतो. मैत्रीमध्ये धमाल करीत असताना सगळे एकमेकांना विविध आव्हानेदेत असतात; धमाल करीत असतात.
मैत्रीतील आव्हानांना पूर्ण केल्याने त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट होत जाते. परंतु एकदा त्यांच्या ग्रुपमधील एक मुलगा ‘शर्वरी’ला मध्यरात्री शवागारातील मृतशरीरांना फ्रेंडशिप बँड बांधण्याचे आव्हान देतो. मैत्रीमधले हे आव्हान स्वीकारत मध्यरात्री बारा वाजता शर्वरी मृत शरीरांना (डेड बॉडिज्)ना फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठीशवागारात जाते. सोबत तिची एक मैत्रीण शवागराबाहेर प्रतिक्षा करीत उभी असते. शवागरात पहिल्या पाच मृत शरीरांना(डेड बॉडिज्) फ्रेंडशिप बँड बांधल्यावर जेव्हाती सहाव्याला बांधण्यास जाते, तेव्हा ते शरीर विचित्र प्रकारची हालचाल करते. त्यामुळे शर्वरीला भोवळे येते व ती बेशुद्ध पडते.
इकडे फार वेळ झाला तरी बाहेर न आल्याने तिची मैत्रीण आपल्या मित्रांसह थेट शवागरात जाण्याचा निर्णय घेते. मात्र, तिथे भयान दृश्य त्यांना दिसते. शर्वरीचा खुनझाला असतो. सर्वांना प्रचंड धक्का बसतो. कॉलेजचे डीन पोलिसांना बोलवतात. पंचनामा आणि पोस्टमॉर्टम(शवविच्छेदन) झाल्यावर शर्वरीचा बलात्कार करूनहत्या झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अख्ख्या कॉलेजात भीतीचे वातावरण निर्माण होते.
पोलिस शर्वरीच्या सर्व सवंगड्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करतात. पोलिसांना कॉलेजच्या कर्मचाèयांवर संशय असतो. सहा-आठ संशयीतांची चौकशीकेल्यावरही खरा गुन्हेगार मात्र, पोलिसांना गवसत नाही. अर्थात ही केस पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. हे आव्हान पोलिस पेलू शकतील का? या केसचा तपासपोलिस कसा लावतील? शर्वरीचा खरा खुनी कोण? या सगळ्या प्रश्नांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. आणि त्यातून प्रत्येक क्षण दर्शकांना एक वेगळाच थरारअनुभवायला मिळतो.या चित्रपटात मुख्य भूमिका श्रीनेश शाहची असून त्याने समीरची भूमिका बजावली आहे. समीरचे शर्वरीवर जीवापाड प्रेम असते. शर्वरीच्याखुनानंतर तो फार दांदरून गेला असतो. उद्या काय होईल, याच्या चिंतेने तो व्याकुळ होतो.
शर्वरीची भूमिका नेहा खानने बजावली आहे. ती कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजकारण्याची मुलगी असते. तिला डॉक्टर होऊन गरीबांची मदत करायची असते. मात्र,त्यापूर्वीच नियतीने तिच्यावर घाला घालते. हर्षाली रोडगेने शर्वरीच्या बेस्ट फ्रेंडची किरणची भूमिका बजावली आहे. किरण पत्रकाराची मुलगी असून ध्येयनिष्ठआहे.
लव विस्पूतेने अजयच्या भूमिकेत असून तो ज्युनियर आहे. त्याला रॅगिंगवगैरे बद्दल फारसे माहित नाही. मात्र, लोकांना डिचवण्याची फार वाईट सवय त्याला आहे. अतुलच्या भूमिकेत रोहित गायकवाड असून असून तो अजयचा चांगला मित्र आहे. प्रवीण शिंदेने सिनिअर विद्यार्थी पंकजची भूमिका बजावत असून त्यालाशर्वरीबद्दल आकर्षण आहे. पंकज शर्वरीला नेहमी मैत्रीसाठी जबरदस्ती करीत असतो. शिवाय ज्युनिअर्सवर दादागिरी करीत असतो.
पंकजचा मित्र अक्षयची भूमिका अनिरुद्ध चौहानने केली आहे. शर्वरीच्या खुनानंतर तो त्याच्या खुन्याचा बदला घेण्यासाठी आतुर असतो. क्राईम ब्रॅन्चच्या सिनिअरइन्स्पेक्टरचा भूमिकेत अनिकेत केळकर असून तो ही केस सोडविण्यासाठी जीवाचे रान करतोय. शशांक धरणे हा इन्स्पेक्टर साटमच्या भूमिकेत आहे. भ्रष्टपोलिस अधिकारी जेव्हा त्याच्या सदाचारावर प्रश्न उपस्थित होतो आणि व्यवहार बदलतो व मिस्ट्री सोडविण्यात मोठी भूमिका बजावतो.
एमटीव्हीवरील स्प्लिट्ज् व्हिला फेम दिव्या अग्रवालचे लावणी हे चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे.
फ्रेंडशिप बँड
निर्माते : निकीता सचिन घाग, सचिन नरेश घाग
सहनिर्माता : वरुन शशिकांत पाध्ये
लेखक व दिग्दर्शक : सचिन नरेश घाग
कार्यकारी निर्माता आणि संकलन : आशिष भास्कर केणी
छाया : विनोद शर्मा
सह-दिग्दर्शक व कास्टिंग डायरेक्टर : कुमार हरीश
संवाद : संदीप सुर्वे
गायक : वैशाली माडे, खुशबू जैन, ज्ञानेश्वर मेश्राम,
कलाकार : श्रीनेश शाह, हिना खान, हर्षाली रोडगे, लव विस्पुते, रोहित गायकवाड, प्रवीण शिंदे, अनिरुद्ध चौहान, अनिकेत केळकर, शशांक दरने
No comments:
Post a Comment