Wednesday, December 13, 2017

‘Spandan’ in Theatres on 15th of Dec.कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित करणारा स्पंदन १५ डिसेंबरला चित्रपटगृहात
नात्यावर भाष्य करणाऱ्या अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आजवर झाली आहे. कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित करत हरवलेला संवाद पुन्हा साधणारास्पंदन-व्हॉट इज रिलेशनशिप’ हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्रह्मचैतन्य एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मीती शैलेश कुलकर्णी, दत्तात्रय नलावडे आणि फडतरे ग्रुप यांनी तर लेखन-दिग्दर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले आहे. माणसामाणसांतला विसंवाद वाढलाय हे आपण ऐकतो, पाहतो आहोत. त्याचे परिणामही जाणवत असतात. हे लक्षात घेऊनच स्पंदन ची कथा सुचल्याचं शैलेश कुलकर्णी सांगतात.
सोशल नेट्वर्किंगच्या वाढलेल्या प्रस्थामुळे आज कुटुंबातील आपसातील संवाद हरवलेला आणि त्यातून नात्यामधील आत्मीयताओलावा कमी होत चालला आहे. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून स्पंदनचे कथानक लिहिण्यात आले आहे. नात्यातील विसंवादत्यावर काढलेला मार्ग, कधी डोळ्याच्या कडा ओलावणारा तर कधी हास्य फुलवणारा असल्याचे दिग्दर्शक शैलेश कुलकर्णी सांगतात. कुटुंबातल्या प्रत्येकाचा एकमेकांशी असलेल्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवताना तीन पिढ्यांची गोष्ट स्पंदन मध्ये दाखवली आहे.
मोहन जोशीअविनाश नारकरसागर कारंडे या कलाकारांसोबत प्रसन्न पवारवैशाली शहा आणि शैलेश कुलकर्णी या नवोदित कलाकारांच्या भूमिका‘स्पंदन’ चित्रपटात आहेत. पाहुणे कलाकार म्हणून कवी संदीप खरे यांनी विशेष भूमिका केली आहे. या चित्रपटाचे छायांकन प्रशांत सोनावणेनिशांत भागवततर संकलन अजित बेर्डे यांचे आहे. सहदिग्दर्शन प्रसाद शिंदे व राज चव्हाण यांनी केले आहे. कास्टिंग स्वाती कडू यांनी केलं आहे. यातील वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांना सचिन पिळगावकरबेला शेंडेजान्हवी प्रभू अरोरास्वप्नील बांदोडकर व बॉलीवूडचे गायक नीरज श्रीधर व के.के यांचा स्वरसाज लाभला आहे. संतोष खाटमोडे, अनामिक चौहान यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. झी म्युझिकने या चित्रपटातील गीते प्रकाशित केली आहेत.
१५ डिसेंबरला स्पंदन प्रदर्शित होणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Many Marathi films commenting on family relationships have been produced till date. Highlighting family values and trying once again to restart the lost conversations, the movie ‘Spandan-What is relationship? releasing on the 15th of December. Presented by Brahmachaittanya entertainment, The movie is produced by Shailesh Kulkarni, Dattatray Nalawade and Phadtare Group writing and directions are by Shailesh Kulkarni. The increase in man to man discord which we observe everyware. We also experience the results. With this in mind Shailesh Kulkarni got the story of ‘Spandan’.
Due to the increased use of Social Network, families have lost their interactions among themselves and there is a dip in the belongingness and tenderness among family members. Keeping this as the central theme, the story of ‘Spandan’ has been written. Strife in relationships, finding a way out of it, at times wetting the corner of the eyes and sometimes creating a burst of laughter, this is how the movie is says, Shailesh Kulkarni. ‘Spandan’ shows us the different relationships that exist between the members of the family. ‘Spandan’ tells us the story of three generations.
Along with Mohan Joshi, Avinash Narkar, Sagar Karande we have new artistes Prasanna Pawar, Vaishali Shah and Shailesh Kulkarni acting in ‘Spandan’. A special guest appearance is made by writer&poet Sandeep Khare. Cinematography is by Prashant Sonawane, NIshant Bhagwat and editing is by Ajit Bherde. Assistant directors are Prasad Shinde and Raj Chavan. The casting is by Swati Kadu. Songs of different genres have been sung by Sachin Pilgaonkar, Bela Shende, Janhavi Prabhu Arora, Swapnil Bandodkar, bollywood singers Neeraj Shridhar and K. K Santosh Khatmode, Anamik Chauhan, has scored the music. Zee Music has released the songs of the film.
‘Spandan’ Releasing on the 15th of Dec.

No comments:

Post a Comment