Friday, December 8, 2017

हिज डे कादंबरी तृतीय पंथांच्या हस्ते प्रकाशित
स्वाती चांदोरकर लिखीत हिज डे कादंबरीचे तृतीय पंथांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा जी एम एस बँक्वेट. न्यू लिंक रोड डी एन नगर येथे करण्यात आला यावेळी श्री प्रवीण दवणे, श्री प्रदीप वेलणकर. श्री प्रमोद पवार. श्री चंद्रकांत मेहेंदळे. सौ माधवी बांदेकर, निवेदिका हेमांगी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ट्रान्स जेंडर संजीवनी मधुरी शर्मा, व विकी शिंदे उपस्थित होते. श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे विचार यावेळी वेक्त केले. “हिज डे” कादंबरी हि ट्रान्स जेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या ह्यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक ह्यांची गुंफण आहे. या कादंबरी चे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस ने केले आहे. 
स्वाती चांदोरकर यावेळी म्हणाल्या तृतीय पंथी लोकांबद्दल आज पर्यंत लिखाण झालेले नाही असे नाही. लोकांना त्याच्या बद्दल जाणूनं घेण्याचे असते परंतु त्यांच्या बदल भिती असते, म्हणून लोक त्यांना टाळतात. त्यामुळे या आधुनिक जगात ते समाजापासून दुरावलेले आहेत. मला त्यांच्या समस्या, त्यांची जगण्याची धडपड, त्यांची तडजोड त्यांच्या वेदना त्यांच्या व्यथा, या बदल जाणून घेण्याची उत्सुकता होती तसेच त्यांच्या समाजाकडे असणाऱ्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवणं मला गरचेच वाटलं. यासाठी जे जे काही त्यांच्या कडून समजले ते मी ह्या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रसंग जरी काल्पनिक असले तरी त्याला सत्याची साथ आहे. त्यांना चांगल आयुष्य हवं आहे ... आणि ह्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे एकाच मागणं आहे ... " आम्हाला माणूस म्हणून जगू द्या " मी त्यांचे हेच मागणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या “हिज डे” ह्या माझ्या कादंबरीतून केला आहे. 
स्वाती चांदोरकर यांची या पूर्वी युथनेशिया, पवित्रम, एक पायरी वर, फॉरवड अँड डिलीट, अनाहत उत्खनन, शेष,  विक्रमादित्य हरला, निर्वाण उपनिषद कादंबरी प्रसिद्ध झाली असून गोल गोल राणी, सेलिब्रेशन, काळाकभिन्न, आणि विक्रमादित्य हरला कथासंग्रह मीरेच्या प्रेमतीर्थावर, मीरा एक वसंत आहे, मीरेची मधुशाला, मीरा श्यामरंगी रंगली, मृत्यूचे अमरत्व, मृत्यायुषी, नानक संसारी संन्यस्त, नानक सूर संगीत एक धून, नानक निरंकारी कवी, नानक परमात्म्याचा नाद ओमकार असे ओशोंचे अनुवादित साहित्य तसेच वपु हे चरित्र व वेक्तिचरित्र हि प्रसिद्ध झाले आहेत. 
तृतीय पंथांच्या समस्या प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकण्याची संधी यावेळी मिळाली तसेच कार्यक्रमाची सांगता त्यांनी लावणी , मुजरा, बधाई सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

No comments:

Post a Comment