Wednesday, November 22, 2017

AMITKUMAR LIVE IN CONCERTअमित कुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट

हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायन क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणजे गायक अमित कुमार. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायकाने आपला स्वत:चा वेगळा ठसा चित्रपटसृष्टीत उमटवला आहे. हिंदीबरोबरच बंगालीभोजपुरीओडियाअसामीमराठी आणि कोंकणी या भाषांमध्ये विविध गाणी गाणाऱ्या अमित कुमार यांची अनेक गाणी गाजली. ही गाणी लाइव्ह ऐकण्याची पर्वणी लवकरच श्रोत्यांना मिळणार आहे. 

येत्या शनिवारी २५ नोव्हेंबरला प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात रात्रौ ८.०० वा. अमित कुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले आहे. अमित कुमार यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद यावेळी संगीतप्रेमींना घेता येईल. पीपल्स आर्टस्‌ सेंटर या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रवींद्र नाट्यमंदिर येथे १० ते ६ या वेळेत उपलब्ध होतील.


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

AMITKUMAR LIVE IN CONCERT

Veteran Playback Singer Amit kumar will perform a with his own Orchestra on his own songs on Saturday 25th November,  2017 at 8.00 pm. The live concert will be staged at Ravindra Natya Mandir, Prabhadevi, Mumbai.

The show is arranged by People’s Arts Centre (Regd.) Mumbai as its 1014th  show   by public demand for a solo performance of Amit kumar.  Fans and admirers are going to witness a three hour long live in concert of memorable numbers composed by leading legendary music directors for Amit Kumar. Donor passes are available at auditorium only. Daily  between 10 am to 6 pm.

No comments:

Post a Comment