Monday, September 11, 2017

‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला चित्रपटगृहात

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असं असलं तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणा-या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेत गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी विठ्ठला शप्पथ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १५  सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वारीतील ऊर्जा व सकारात्मक भावना हे सगळंच विलक्षण अलौकिक असून भक्तांची देवभेटीची ओढ विलक्षण प्रामाणिक असते. विठ्ठला शप्पथ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे.
एका वडिल आणि मुलाच्या नात्याच्या माध्यमातून विठ्ठला शप्पथ ची कथा उलगडते. वडिलांच्या विठ्ठलभक्ती विरोधात असणारा कृष्णा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे बदलतो का? याची रोमहर्षक कथा या चित्रपटातून पहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. विठ्ठला शप्पथ या चित्रपटाची कथापटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवाद लेखन चंद्रकांत पवारकौस्तुभ सावरकरभानुदास पानमंद यांचे आहेत. प्रत्येक देवभक्ताला या चित्रपटाच्या निमित्ताने भक्तीचा अनोखा अनुभव मिळेल असा विश्वास दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.
वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत  दिलं आहे.   
मंगेश देसाईअनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशीसंजय खापरे, अंशुमन विचारेविजय निकम, केतन पवारप्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसोबत विजय साईराज, कृतिका गायकवाड ही नवोदित जोडी या चित्रपटात आहे. छायांकन सँडी यांचं असून संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव तर कलादिग्दर्शन वासू पाटील यांच आहे. ‘विठ्ठला शप्पथ १५ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“Vitthala Shapath” in the theatres on 15th September
The greatness of the deity of Maharashtra,Lord Vitthal, has been shown in many movies. Even then the people eagerly wait for movies based on the dusky Lord. Keeping the expectations of the people in mind, Guru Darshan Movies and Pahel Productions L.L.P. have produced the movie “Vitthala Shapath” in Marathi. The movie is releasing on the 15th of September. The energy and the positive emotions during the Waari is extraordinary, and the devotees longing to meet the Lord is amazing and real. With the movie “Vitthala Shapath” we get to experience the yearning and hope of the devotees to meet the Lord. The movie underlines the emotional attachment of the bhakts with Lord Vitthal.
The story of “Vitthala Shapath” unfolds through the relationship of a father and son. Does Krishna, who is against his father's devotion towards Vittal, change due to the various incidents that take place in his life? We will see this thrilling story in this movie. The movie is directed by Chandrakant Pawar. The story and screenplay of“Vitthala Shapath” is written by Chandrakant Pawar, the dialogues are written by Chandrakant Pawar, Kaustubh Savarkar and Bhanudas Panmand. Chandrakant Pawar expressed his belief that the devotees will get to experience a totally different level of bhakti.
There are four songs of different genre. They have been recorded in the voices of Rahul Deshpande, Swapnil Bandodkar, Aanandi Joshi, Aadarsh Shinde and Pravin Kunwar. The songs written by Mangesh Kangane and Kshitij Patwardhan have been set to music by today's leading pair of music directors Chinar-Mahesh. They have also written the background score.
Along with Mangesh Desai, Anuradha Rajadyaksha, Uday Sabnis, Vidhyadar Joshi, Sanjay Khapre, Anshuman Vichare, Ketan Pawar, Vijay Nikam, Pranav Raorane and Rajesh Bhosale, we have the new leading pair of Vijay Sairaj and Krutika Gaikwad. Cinematography is by Sandy, editing is by Ashish Mhatre and Apurva Motiwale. Choreography is by Umesh Jadhav and art direction by Vasu Patil. “Vitthala Shapath” will be widely released on the 15th of September.

No comments:

Post a Comment