Saturday, April 15, 2017

‘ताटवा’ संगीत अनावरण सोहळ्याची सुरेल संध्याकाळसध्या मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे. अनेक कलात्मक, आशयघन आणि दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होत आहे. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत आणिसामाजिक भान जपणाऱ्या ‘शरयु आर्ट प्रोडक्शन’ निर्मित ताटवा या आगामी मराठी सिनेमाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची व गीतांची झलक दाखवण्यात आली. डॉ. शरयु पाझारे निर्मित व अरुण नलावडे दिग्दर्शित ताटवा हा सिनेमा २६ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुंदर कथेच्या कॅनव्हासवर ताटवा सिनेमातील गीतांनी सुरेख रंग भरले असल्याची भावना व्यक्त करताना ताटवा सिनेमाला गायिका अनुराधा पौडवाल यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने नाविन्याचा ध्यास घेत स्वत:ला घडवायला हवं असं सांगताना ताटवा या सिनेमातून हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची भावना निर्मात्या डॉ.शरयु पाझारे यांनी यावेळी व्यक्त केली.

ताटवा या चित्रपटात तीन गीतांचा नजराणा आहे. गीतकार श्रीपाद भोले यांच्या शब्दांनी यातील गीते सजली असून संगीतकार अतुल जोशी व प्रशांत फासगे यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. यातील ताटवा हे टायटल सॉंग योगिता गोडबोले-पाठक यांनी गायलं आहे. ‘देवाची करणी’ हे हृद्यस्पर्शी गीत अतुल जोशी व प्रसाद शुक्ल यांनी गायलं असून ‘वेडा जीव गुंतला’ हा तुझ्यात हे प्रेमगीत सावनी रविंद्र व केवल वाळंज यांनी स्वरबद्ध केलं आहे.

समाजातील विषमतेवर ताटवा या सिनेमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अरुण नलावडे दिग्दर्शित या चित्रपटात  संजय शेजवळ व गौरी कोंगे या जोडी सोबत अरुण नलावडे, डॉ.शरयु पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ.सरिता घरडे, विक्रांत बोरकर, शीतल राऊत, नूतन धवणे, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत. ताटवा चित्रपटाचे चित्रीकरण चंद्रपूर येथे झाले आहे.

चित्रपटाची कथा एम.कंठाळे यांनी लिहिली असून संवाद डॉ. शरयु पाझारे, डॉ. सरिता घरडे, सुरेश कांबळे, शैलेश ठावरे यांनी लिहिलेत. सदानंद बोरकर यांनी कलादिग्दर्शन तर ज्येष्ठ छायाचित्रकार इम्तियाज बारगीर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. संकलन बी.मह्न्तेश्वर व रोहन सरोदे यांचं आहे. चित्रपटाची सहनिर्मिती विशाल रामटेके व स. कोंडब्त्तुलवार यांनी केली असून मुख्य सहदिग्दर्शन प्रमोद गुंजाळकर यांनी केलं आहे. सुजाता कांबळे, भारत शिरसाट, सुधीर वाघमारे यांनीसुद्धा सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषा बाबा खिरेकर तसेच वेशभूषा सुजाता कांबळे यांची आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते विवेक कांबळे आहेत. २६ मे ला ताटवा प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment