Tuesday, April 11, 2017

‘गजर कीर्तनाचा’- हनुमान जयंती विशेष



धार्मिक सणांचं औचित्य साधत झी टॅाकीज 'गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' हा नव्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम घेऊन आले आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळला. या कार्यक्रमामुळे अध्यात्मिक निरुपणाचा आस्वाद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येत आहे. येत्यामंगळवारी ११ एप्रिलला हनुमान जयंतीच्या निमित्ताने झी टॉकीजवर,कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली पाथाडे यांच्या कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

मारूतीच्या उपासनेमागे फार मोठा अर्थ आहे. त्यामागील शास्त्र व त्याचे माहात्म्य याची अनेकांना पुरेशी माहिती नाही. ही माहिती करून देण्याच्या उद्देशाने  'गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' या कार्यक्रमात हनुमान जयंती विशेष भाग रंगणार आहे. हनुमान जयंतीचे अध्यात्मिक महत्व व हनुमानाविषयीची सविस्तर माहिती या कीर्तनात करून देण्यात येणार आहे. या कीर्तनाचा आस्वाद मंगळवार ११ एप्रिलला सकाळी .३० ते .३० या वेळेत प्रेक्षकांना घेता येईल. हनुमानाच्या जयघोषात रंगणारा हा कीर्तन सोहळा निश्चितच भक्तीमय ठरेल.

No comments:

Post a Comment