Saturday, December 3, 2016

‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची‘लिपस्टिक लगा के’ म्हणत प्रेक्षकांना आपल्या अदाकारीचा जलवा दाखवणारी किंगफिशरची मराठमोळी ‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली राऊत आता आर.पी.जी प्रोडक्शन प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित हिरो या आगामी मराठी सिनेमातल्याआयटम सॉंगवर अभिनेता भूषण पाटील सोबत थिरकली आहे.या आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच चित्रनगरीमध्ये संपन्न झाले. एन.एन सिद्दिकी या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत.  

मिरची कोल्हापूरची’ असे बोल असलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. निखिल कोटीभास्कर यांनी लिहिलेलं हे भन्नाट आयटम सॉंग रेशमा सोनावणे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात गायलं असून निखिल कोटीभास्कर, सेमल यांच संगीत या गाण्याला लाभलं आहे. या आयटम सॉंगच्या निमित्ताने किंगफिशर कॅलेंडरचेग्लॅमर मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की. या चित्रपटाचे सहनिर्माते अनिस मोराब आहेत. हिरो चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment