‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ बनलेल्या अनेक बिनधास्त, बेधडकमॉडेल्सनी आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये व बॉलिवूडमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. विशेषतः बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ हे एक उत्कृष्ट व्यासपीठ मानले जाते. बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतरकिंगफिशरची मराठमोळी कॅलेंडर गर्ल सोनाली राऊत आता मराठी सिनेमात येण्यासाठी सज्ज झाली आहे.
सोनालीने 'किंगफिशर कॅलेंडर गर्ल' स्पर्धा जिंकली आणि बॉलीवूडचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या 'द एक्सपोज' मधून झळकलेल्या सोनालीने या चित्रपटात नकारात्मक भूमिका रंगविली होती. रणवीरसोबत एका जाहिरातीसाठी तिने केलेलं एक हॉट फोटोशूट खूपच चर्चेत राहिलं. त्याचबरोबर ‘ग्रेट ग्रँण्ड मस्ती’ या चित्रपटातील ‘लिपस्टिक लगाके’ हे सोनालीवर चित्रित झालेलं गाणं तिच्या बिनधास्त अदांनी चांगलंच गाजलं. सोनाली ‘बिग बॉस ८’ तसेच ‘झलक दिखला जा सीझन ९’ मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती.
आगामी हिरो या मराठी सिनेमातलं एक धमाकेदार आयटम सॉंग सोनालीवर लवकरच चित्रित होणार आहे, आणि त्या निमित्ताने किंगफिशरचं ग्लॅमर मराठी पडद्यावर प्रथमच पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.
No comments:
Post a Comment