Wednesday, October 26, 2016

श्रावणबाळ रॉकस्टार ची दिवाळी मस्तीझी युवा या वाहिनीवरील श्रावणबाळ रॉक स्टार या मालिकेच्या सेटवर नुकतीच  दिवाळी साजरी करण्यात आली . यावेळीसर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली . यात बऱ्याच कलाकारांचे नवे  नवे कलागुण दिसून आले . केतकी म्हणजेचकामिनी हि  सुंदर अभिनेत्री , उत्तम कलाकार आहे हे आपल्या सर्वानाच माहित आहे . ती उत्तम नाचते हे हि जगजाहीर आहे , पण ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे . सेटवर सर्वांबरोबर मस्ती करताना तिने सुंदर गाणंही गायले . त्याच प्रमाणेसंचिता म्हणजेच नितु हि अतिशय उत्तम मिमिक्री करते . तिने डोरेमॉन नामक कार्टून मधील नोबेतो या केरेक्टर चाहुबेहूब आवाज काढत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या . या दिवाळी सेलेब्रेशन मध्ये मालिकेतील नीरज गोस्वामी ,केतकी पालव , संचित कुलकर्णी , राजेश देशपांडे , सुप्रिया विनोद , आशिष कापिसकर पार्थ घाटगे आणि  जयवंत वाडकरहे  सर्वच कलाकार उपस्थित होते .  झी युवा च्या या सर्वच कलाकारांनी सर्वाना इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचंआवाहन केले आहे . श्रावणबाळ रॉकस्टार हि मालिका झी युवा ह्या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज :३० वाजतालागते .

No comments:

Post a Comment