Sunday, October 23, 2016

कौल मनाचा चित्रपटाचा भव्य प्रीमिअरकौल मनाचा या सिनेमाचा भव्य प्रिमीअर शो नुकताच मुंबईत संपन्न झाला. सिनेमातील स्टारकास्टसह  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निर्माता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. या प्रिमीअरप्रसंगी आपल्या पाल्यासोबत उपस्थित असलेल्या पालकांनी हा चित्रपट वास्तवदर्शी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित कौल मनाचा या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे. अनेक गोष्टीवर भुलण्याच्या या वयात मुलांची मानसिक घालमेल लक्षात घेऊन त्यांना योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं, हे सांगण्याचा प्रयत्न कौल मनाचा या चित्रपटातून करण्यात आला आहे.

या सिनेमात राजेश शृंगारपुरेसमीर धर्माधिकारीअमृता पत्कीमिलिंद गुणाजी,विजय चव्हाणजयवंत वाडकरविजय गोखले,वर्षा दांदळेकमलेश सावंत,श्वेता पेंडसेआशुतोष गायकवाडगिरीजा प्रभूनिनाद तांबडेगणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment