Sunday, August 14, 2016

बंध-मुक्त नाटकाचा शानदार प्रिमियरप्रेक्षक पसंतीवर ठरणार नाटकाचा उत्तरार्ध

आयुष्याची सुरुवात आणि शेवट चांगला व्हावा असा विचार प्रत्येकजण करीत असतो. असाध्य आजाराने हतबल होत मृत्यूची प्रतीक्षा करण्यापेक्षाइच्छामरण हा शेवटचा पर्याय काहींना जवळचा वाटतो. इच्छामरणास कायदेशीर हक्क मिळावा यासाठी अनेक सामाजिक संस्था कायदेशीर लढाई लढत आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारं बंध-मुक्त हे नवकोरं नाटक रंगभूमीवर चांगलंच चर्चेला आलंय. ‘जगदंब क्रिएशन्स’ निर्मित, ‘तिरकिटधा’ प्रस्तुत बंध-मुक्तनाटकाचे लेखन विवेक आपटे तर दिग्दर्शन डॉअनिल बांदिवडेकर यांनी केलंय. अभिनयासोबत या नाटकाच्या निर्मितीत देखील डॉअमोल कोल्हे यांचा सहभाग आहे.
रंगभूमीवर प्रथमच बंध-मुक्त नाटकाचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्रनाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सौ.रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार संजय केळकर, अॅडव्होकेट उज्वल निकम, किरण शांताराम, भरत जाधव, विजय केंकरे, भरत दाभोळकर, मधुरा वेलणकर, प्रिया मराठे, समिधा गुरु, निर्माते प्रसाद कांबळी व हर्षद तोंडवळकर यांच्यासह सिनेनाट्यवैद्यकीय,राजकारणसाहित्यउद्योग  सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जूनउपस्थित होते. या नाटकाचे खास आकर्षण म्हणजे दर प्रयोगाला रसिकांची मते जाणून घेत नाटकाचा उत्तरार्ध निश्चित केला जाणार आहे. यासाठी नाटकाच्या दुसऱ्या अंकाचे दोन स्वतंत्र भाग केले असून प्रेक्षकांच्या अधिक पसंतीची पावती मिळालेल्या पर्यायाची निवड दुसऱ्या अंकासाठी केली जाणार आहे. मराठीरंगभूमीवर रसिकांची मते जाणून घेत उत्तरार्ध उलगडणारे हे पहिलंच नाटकं ठरणार आहे.
 बंध-मुक्त या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पनायेत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेएक सर्जन,त्याची गुन्हेगारांच्या मानसशास्त्रात डॉक्टरेट असलेली बायकोएक वकील आणि एकमानवी हक्क चळवळीची लीडर या चौघांमध्ये घडून आलेली वैचारिक चर्चा म्हणजेबंध-मुक्त हे नाटकयात कोणाभोवती बंध’ आवळले जाणार आणि कोणाभोवतालचेपाश मोकळे होऊन तो मुक्त’ होणार हे नाटक पहाताना उलगडेल. डॉअमोल कोल्हे, केतकी थत्तेराजन शंकर बनेशंतनु मोघेविवेक आपटेपंढरी मेदगेलतिका सावंतया सर्वच कलाकारांची जोरदार अदाकारी बंध-मुक्त मध्ये पहायला मिळणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव यांची निर्मिती असलेल्या बंध-मुक्त नाटकाची सहनिर्मिती डॉ. अजित देवल यांनी केली आहे. विवेक आपटे लिखित या नाटकाचे पार्श्वसंगीत राहुल रानडे यांनी दिलं आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची तर नेपथ्य राजन भिसे यांनी केलंय. वेगळ्या कथाविषयावरील हे नाटक नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल.

No comments:

Post a Comment