मुंबई, 1 मे, 2016:
मॅक्सेल फाऊंडेशनतर्फे कॉर्पोरेट आणि उद्योगक्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे हे सलग पाचवे यशस्वी वर्ष आहे! पहिल्या वर्षापासूनच कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करत असलेल्या उद्योजकांची व कॉर्पोरेट क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या बिझिनेस-लिडर्सची दखल घेणे, तसेच इनोव्हेटर्सचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणि खास करून आपल्या पुढिसाठी रोलमॉडेल म्हणून समोर आणणे हा उद्देश हे पुरस्कार देण्यामागे मॅक्सेल फाऊंडेशनचा आहे.
आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून २०१६ ह्या वर्षासाठी मॅक्सेल फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. हे विविध पुरस्कार असे आहेत :
कृषि-औद्योगिक क्षेत्रात मुलभूत काम करणारे महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको)चे चेअरमन व संस्थापक प्रख्यात उद्योजक श्री. बद्रिनारायण रामूलाल बारवाले यांना जीवनगौरव. कृषि-औद्योगिक क्षेत्रात श्री बारवाले हे अतिशय ख्यातनाम आहेत. भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकर्यांना उपलब्ध करून देऊन जणू त्यांनी एकहाती क्रांती घडवून आणली. त्यांच्या ह्या कार्यामुळे बियाणे-उद्योग हे एक क्षेत्रच खाजगी उद्योगक्षेत्राला मिळाले. अशा प्रकारच्या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पुरक व्यावसायांचाही विस्तार झाला आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळाला.
भारत विकास ग्रुपचे संस्थापक, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंत आर. गायकवाड यांना 'एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप'. शून्य बॅंक बॅलन्स असलेला एक इंजिनिअर ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बीव्हिजी ह्या फर्मचा प्रमुख अशी त्यांची वाटचाल आहे. फॅसिलीटी मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणार्या त्यांच्या ह्या फर्मचे काम संपूर्ण भारतभर विस्तारलेले आहे. संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्ट यांच्या हाऊसकिपींगचे काम त्यांच्या कंपनीकडे आहे.
एअरबस ग्रुप इंडियाचे इंडस्ट्री डेव्हलपमेंट, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अॅन्ड ऑफसेट्स यांचे व्हाईस-प्रेसिडेंट आशिष सराफ यांना एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशिप. एअरबस ग्रुप इंडियाच्या एअरबस हेलिकॉप्टर, एअरबस आणि एअरबस डिफेन्स व स्पेस या तिन्ही विभागांची सुत्रे त्यांच्याकडे आहेत. भारताच्या उत्पादन क्षमतेबाबत जगाचा दृष्टिकोन बदलवण्याची महत्वाची कामगिरी आशिष सराफ करत आहेत, त्या मार्फत कंपनीच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला त्यांनी बळ दिलेले आहे.
एनप्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक श्रीकृष्ण भार्गव करकरे आणि अलका श्रीकृष्ण करकरे यांना एक्सलन्स इन इनोव्हेशन्स. स्कीड-माऊंटेड मॉड्यूलर पायपिंग सिस्टम्सचा नावीन्यपूर्ण शोध त्यांनी लावला. त्यामुळे पेट्रोकेमिकल, वीज, खते, कागद आणि पोलाद या गुंतागुंतीच्या उद्योगातील प्रक्रियेचे प्लग-व-प्ले असे सुलभीकरण झाले. जीई, सिमेन्स, हिताची, मित्सिबिशी, इब्रा आणि तोशिबा यासारख्या जागतिक क्लाएंटचे काम ते करतात. ५ लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिघात १.२५ लाख चौरस फुटांचे वर्कशॉप मरकल येथे एनप्रोने बांधलेले आहे आणि त्यांच्याकडे आज घडीला ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या संचालक, सिम्बॉयसिस फाऊंडेशनच्या व्हाईस-प्रेसिडेंट आणि सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख संचालक, डॉ. स्वाती मजुमदार यांना मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. देशातील अगदी दूरवर असलेल्या ग्रामीण भागांचा विचार करुन त्यांनी माहिती व दळणवळण तंत्रज्ञान यांचा कल्पकतेने उपयोग करुन घेत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ह्या भागापर्यंत पोचवले. ह्यामुळे उद्योगांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनूष्यबळ अधिक संख्येने उपलब्ध होईल आणि त्यामुळे देशाच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला मोठं पाठबळच मिळेल.
तसेच मराठवाडा ऑटो क्लस्टर, औरंगबादया संस्थेस मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. मराठवाडा ऑटो क्लस्टर (एमएसी) ही उद्योगांना पायाभूत सुविधा देणारी सपोर्ट सिस्टम आहे. ही सेवा पुरवते, त्याचसह कौशल्यप्राप्त टेक्निशियन्सचे आणि इतर मनूष्यबळ त्यांच्याकडे आहे. उद्योजक एमएसीबरोबर संपर्क साधून ह्या बाबतीतील आपली गरज पूर्ण करू शकतात. मराठवाडा भागातील औद्योगिक वातावरणात सुधारणा करणे हे उद्दीष्ट ठेवूनसमान विचारांच्या उद्योजकांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. उद्योगांना आवश्यक असलेल्या अनेक सेवा एमएसी पुरवते, उदा: प्रोटोटायपिंग, लेझर कटींग, कटींग स्लिटींग लाईन इत्यादी. तसेच कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गतउद्योगाशी संबंधित इंजिनिअरींग
सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण आणिमिडल मॅनेजमेंट स्तरावरील कर्मचार्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आणिप्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांना तयार करणे हेही काम एमएसी करते.
बिगबिझनेस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे कन्सल्टींग डायरेक्टर, मकरंद पाटील यांना मॅक्सेल स्टार्टअ पपुरस्कार. उद्योगांसाठी संकल्पना ते प्रकल्प कार्यान्वित करणे इथपर्यंतची रुपरेखा देणे ते करतात. त्याचबरोबर, उद्योगांना प्रगतीपथावर जाण्यासाठी विविध कल्पना सुचवणे, उद्योगाची पुर्नरचना करण्याचा मार्ग सांगणे, खर्चात बचतीचे उपाय सुचवणे हेही करतात. तसेच लघू व मध्यम उद्योगांना सल्ला देतात. त्यांची मुंबई, दुबई, सिंगापूर, घाना आणि स्पेनमध्ये ऑफिसेस आहेत.
तसेच एम-इडिकेटरअॅपचे निर्माते, एम-बॉन्ड सॉफ्टवेअर कन्सल्टंसी सर्व्हिसेसचे संस्थापक सचिन टेके यांना मॅक्सेल स्टार्टअप पुरस्कार. एम-इंडिकेटर हे अतिशय लोकप्रिय मोबाईलअॅप आहे. स्मार्टफोन वापरणार्यांना ह्याविषयी अधिक सांगणे न लगे. लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून रोजच्या रोज लोकलने प्रवास करणार्या एक कोटी प्रवाशांना उपयोगी असणारे मोबाईल त्यांनी अॅप बनवले. त्यातून पुढे भारतीय रेल्वे, बेस्ट बस अशा संस्थांनीही या अॅपबरोबर स्वत:ला जोडून घेतले आणि त्याची उपयुक्तता दिवसागणिक आणखीच वाढली.
मॅक्सप्लोअर - एकसप्लोरिंग आंत्रप्रेन्युअरशिप'
२०२० पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थामधून दरवर्षी ३० लाख विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र या विषयात पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनिअर, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतात, त्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत. तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेत रोजगार-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. आज आयडिया हे भांडवल आहे आणि स्टार्ट अप हा कळीचा शब्द बनलाआहे आणि म्हणू उद्दोजाकाता मुलांना लहान वयातच शिकवलं जावही काळाची गरज आहे.
आपल्या बेरोजगारीच्या प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर आपल्याला असं दिसतं की पाठ्य पुस्तकांतून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच उद्योजकतेचे धडे मिळणंगरजेचे असल्याचे मत अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त होत असतं. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. आणि जरी आपण पुस्तक तयार केलं तरी त्याला प्रशिक्षत शिक्षक मिळणं ही मोठी समस्या असेल. गेल्या अनेक दशकांची ही खंत मक्सेल फाऊंडेशच्या नितीन पोतदार यांनी दूर करीत मॅक्सप्लोअर-नाही पाठ्यक्रम! नाही शिक्षक!! हा प्रक्टिकल प्रोजेक्टबेस्ड पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 7 मे रोजी उद्योजक राहुल बजाज यांच्या हस्ते होणार आहे. मॅक्सेल तर्फे पुढील शैक्षणिक वर्षा मध्ये मुंबईच्या 25 ठराविक शाळांमध्ये (इयता आठवी किंवा नववी) हा दोन महिन्यांचा हा उपक्रम निशुल्क राबविला जाणार आहे. या संबंधाची जास्त माहिती www.maxellfoundation.org किंवा maxplore9@gmail.com वर मिळु शकेल.
7 मे 2016 रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये मॅक्सेल पुरस्कार २०१६ देण्यासाठी जेष्ठ उद्दोजक श्री. राहूलं बजाज, चेअरमन बजाज ऑटो ग्रुप, यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा फक्त खास निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा होईल. अतिशय दिमाखदार वातावरणात दरवर्षी हा मॅक्सेल पुरस्कार सोहळा संपन्न होतो हेही याचे वैशिष्ट्य आहे.
No comments:
Post a Comment