Tuesday, April 5, 2016

‘ती फुलराणी’ रुपेरी पडद्यावर





गाजलेली कलाकृती प्रत्येक प्रतिभावंताला खुणावत असते. अनेक गाजलेल्या कलाकृतीचं माध्यमांतर हे प्रेक्षकांसाठीही ट्रीट असते. जॉर्ज बर्नाड शॉ ह्यांच्यापिग्मॅलिअन या नाटकावरून ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म आणि महाराष्ट्राच्या लाडक्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ती फुलराणीहे अजरामर नाटक आलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणारी फुलराणी आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. दिग्दर्शक अमोल शेटगे, अभिनेत्री राजश्री लांडगे व अभिनेता सुबोध भावे या कलासंपन्न मंडळीना घेऊन ती फुलराणी ही कलाकृती रुपेरी पडद्यावर आणणार आहेत.

गाढवाचं लग्न, सिटीझन या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री राजश्री लांडगे आणि अभिनय, दिग्दर्शनातून आपला स्वंतत्र ठसा उमटवणारा अभिनेता सुबोध भावे ही फ्रेश जोडी ‘ती फुलराणीच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहेत. फुलराणीच्या भूमिकेतील राजश्री लांडगे सोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहेत.

दिग्दर्शक अमोल शेटगे यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकारणारी ही कलाकृती रुपेरी पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. 

No comments:

Post a Comment