Monday, January 11, 2016

विनोदाची भन्नाट मेजवानी ‘नवरा माझा दुसऱ्याचा’




रंगभूमीवर सध्या विनोदी नाटकांचा ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये दिनेश दाभणेनरेश यादवसंजय बांदेकर निर्मित व महेश ठाकरेबी एच पाटीलआत्माराम पाटील सहनिर्मित नवरा माझा दुसऱ्याचा’ हे नवकोरं विनोदी नाटकं लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे धमाल विनोदी नाटक म्हणजे प्रेक्षकांना हास्याची मेजवानी असणार आहे. २० जानेवारीला हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

 श्री. गणेश प्रोडक्शन प्रकाशित श्री सिद्धेश्वर व नउनि निर्मित या नाटकात एक कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. अकल्पितपणे घडणाऱ्या घटनेद्वारे उभा राहिलेला पेच व या पेचाचे उत्तर शोधताना उडणारी धमाल म्हणजे नवरा माझा दुसऱ्याचा हे धमाल नाटक. या पेचाचं उत्तर शोधण्यात ते यशस्वी होतात का?हया प्रश्नाचं उत्तर आपल्याला हया नाटकात पहायला मिळेल.

या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री सिया पाटील या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करणार आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणारे दिग्दर्शक शामराव मांजरेकर यांची ही पहिली व्यवसायिक नाट्यकृती आहे. सामान्यांना भेडसवणाऱ्या एका समस्येवर विनोदी अंगाने प्रहार करणार सुनील पवार लिखित शामराव मांजरेकर दिग्दर्शित हे नाटक प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करेल.

सिया पाटील ह्यांच्या सोबत किशोर चौघुलेमैथिली वारंगपरी जाधवअक्षय अहिरेरोहित मानेया कलाकारांच्या भूमिकाही या नाटकात आहेत. अभिनेता किशोर चौघुले यात नवरंगी भूमिकेत असणार आहेत. याच नेपथ्य व प्रकाश योजना ज्ञानेश्वर आंगणे यांनी केली आहे. आनंद कुबल यांचं पार्श्वसंगीत असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. निर्मिती प्रमुखाची जबाबदारी सागर मसुरकर पार पाडत आहेत. नृत्यदिग्दर्शन प्रदिप कालेकर व राजेंद्र कारंडे यांच आहे. रंगभूषेची जबाबदारी सचिन जाधव तर ड्रेस डिझायनिंगची जबाबदारी स्मिता कोळी यांनी सांभाळली आहे. नाटकाचे सूत्रधार सुरेश भोसले आहेत. नेपथ्य निर्माण गॅलकसी आर्टच असून प्रकाश सहाय्य गणेश आर्ट्स यांचं आहे. ध्वनी संयोजन तेजस राऊत व रंगमंच व्यवस्था अभय आब्रे यांनी सांभाळली आहे.

२० जानेवारीला ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

No comments:

Post a Comment