Mumbai, 17 Nov- India's top 30 bodybuilders and an equal number of mixed pairs (men and women) will fight it out for the title in the prestigious TALWALKARS' CLASSIQUE 2015- INVITATIONAL BODYBUILDING COMPETITION to be held in Mumbai on December 16-17, 2015 in Mumbai. The event which carries a top cash prize of Rs 5 lakhs and a handsome trophy is being organised by TALWALKARS BETTER VALUE FITNESS LIMITED under the auspices of the Indian Body Builders Federation, the national body for the sport of bodybuilding recognised by the Ministry of Youth Affairs and Sports, Government of India.
The total prize money for the event is approximately Rs 16.25 lakhs for the men's event with the second and third placed athletes getting Rs 3 and Rs 2 lakhs respectively. The winning pair in the team event for men and women will be awarded Rs.1 lakh. The top ten will be the beneficiaries of the largesse offered by the organisers.
The top 30 champion body builders representing the Indian Railways, Indian Navy, Maharashtra, Delhi, Odisha, Tamilnadu, Central Reserve Police Force, Haryana, Uttar Pradesh and Delhi will be vying for a place in the top ten or the finals on December 16, 2015 in the preliminaries to be held at Orchid Hotel, Near Domestic Airport, Vile Parle
Indian Navy's Murali Kumar an Asian and World Champion, who has been at the top for the past two years will be among the favourites to bag the title. He will face a tough time from teammates Vipin Peter, Hari Prasad and the likes of A Boby Singh, himself a World Champion of the Railways and a couple of others. The performance of Shweta Rathod in the mixed pairs will be a major attraction in the sport in India where womens' bodybuilding is at a nascent stage.
The other contenders from Maharashtra include Sunit Jadhav, Swapnil Narwadkar, B Mahweshwaran, Sagar Mali, Sagar Katurde, Jagdish Lad, Mahendra Chavan and Deepak Tripathi.
While addressing the media, Madhukar Talwalkar of TALWALKARS BETTER VALUE FITNESS LIMITED spoke briefly about the institution's standing in the fitness industry in India.
He said, ''We are on the scene for almost six decades and our aim is to spread the message of wellness and fitness through bodybuilding and from what I have seen and experienced over the years I can certainly say that one bodybuilder can inspire thousands of others to exercise. And the aim of organizing an event of such magnitude is to exactly spread the message and at the same time help promising athletes to achieve their goals.''
Justifying the necessity of the Mixed Pairs event, Talwalkar said, through this I wish to convey to all married couples to understand the importance of good health and fitness through regular exercise. Though the concept is new we have yet managed to attract half a dozen entries. That one of the pairs is a husband and wife is notable and an example for others to follow.
Replying to a query about the high fees charged by gyms or health clubs, he justified that with a counter, ''if you feel fitness is a costly thing then try being ill or embracing illness and tell me which one is better?'' that too with his trademark radiant smile on his face.
Chetan Pathare, the General Secretary of the Indian Body Builders Federation was also present during the media inter-action. Speaking on the occasion he complimented Talwalkar, the father of the Indian fitness industry for his passionate support to the sport. The competition TALWALKAR CLASSIQUE, the brain child of Talwalkar with a good 16.25 lakhs as prize money is not just about awards about giving a proper platform to our athletes and it is also about taking care of them, remarked Pathare.
The Secretary of the Maharashtra State Bodybuilding Association, Adv. VikramRothe assured, with the resources at our disposal I am sure we will make this event a grand success.
The winner of the last edition of this competition Murali Kumar, a multiple time national champion and Asian Winner and World Runner-up and World Championships bound athletes SunitJadhav, Jagdish Lad, Vipin Peter and Robby Meetei with local lad SagarKaturde were present at the inter action and displayed their physique much to the delight of the gathering. Their presence gave a fair indication as to the intensity of the competition one is likely to witness a month from now.
In accordance with the anti-doping policy the NADA- National Anti Doping Agency will be conducting random tests during the competition.
The FINALS are scheduled to be held on December 17, 2015 at the Yeshwantrao Chavan Auditorium, Matunga (West) from 5.00 pm.
देशातील अव्वल 30 खेळाडूंच्या पीळदार सौष्ठवाचे प्रदर्शन
प्रथमच मिश्र जोडीची स्पर्धा रंगणार
मुंबई, दि.17 (क्री.प्र.)- भारतातील लोकांना शरीरसौष्ठवाचे महत्त्व पटवून देताना शरीरसौष्ठवपटूंना व्यावसायिकतचे धडे आणि उत्पन्नाचे साधन मिळवून देणाऱया व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांनी पुन्हा एकदा भारतीय शरीरसौष्ठवासाठी तळवलकर क्लासिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रथमच पुरूष आणि महिलांची मिश्र स्पर्धाही होणार आहे. भारतातील 30 दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग आणि सर्वाधिक 16 लाखांचे रोख पुरस्कार असलेली श्रीमंत आणि ग्लॅमरस स्पर्धा येत्या 16 आणि 17 डिसेंबरला मुंबईत रंगणार आहे.
आज भारतातील शरीरसौष्ठव खेळाची कीर्ती जगभर पसरली आहे. भारताचे बलवान आणि पीळदार खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे झेंडे रोवत असल्यामुळे तळवलकर क्लासिक स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तळवलकरांची स्पर्धा क्लासिक ठरावी म्हणून मि.वर्ल्ड, मि.एशिया, मि. इंडियासारखे सर्वोच्च बहुमान संपादणारे सर्वच खेळाडू आपले कसब पणाला लावण्यासाठी सज्ज होत आहेत. तळवलकर बेटर वॅल्यू फिटनेसने शरीरसौष्ठवाचा दर्जा उंचावण्यासाठी केवळ पुरस्कारच नव्हे तर स्पर्धेला ग्लॅमरस आणि स्फूर्तीदायक करणार असल्याचे व्यायाम महर्षी मधुकर तळवलकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे ही स्पर्धा केंद्र सरकारची मान्यता असलेल्या इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने होत असल्यामुळे शरीरसौष्ठवातील स्टार एकाच मंचावर पाहण्याची संधी मुंबईकरांनी मिळणार आहे. गतविजेता मुरली कुमार, मि. आशिया सुनीत जाधव, जगदीश लाड, विपीन पीटर, बॉबी सिंग, बी महेश्वरनसारखे बाहुबली आपल्या पीळदार स्नायूंनी मुंबईकरांना भुरळ घालण्यासाठी आठ-आठ तास कसून सराव करीत आहेत. भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद असलेले रेल्वे आणि नौदलाचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्याखेरीज महाराष्ट्र,ओडिशा, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेशचे स्टार तळवलकर क्लासिकच्या टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. भारताचे खरेखुरे ग्लॅमर सर्वात श्रीमंत स्पर्धेसाठी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मंचावर अवतरतील असा विश्वास आयबीबीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला. क्रीडाप्रेमी आणि शरीरसौष्ठवाचे उपासक असलेल्या तळवलकरासारख्या दिग्गजांमुळेच आमचा खेळ बलवान होत असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
16 लाखांची बक्षिसे आणि मिश्र जोडी स्पर्धा
तळवलकर क्लासिक ही आजवरची सर्वात श्रीमंत स्पर्धा ठरणार आहे. 16.25 लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत विजेता 5 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षीसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3लाखांचा तर दहावा क्रमांक 35 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल अशी माहिती आयोजकांनी दिली.
सारे काही शरीरसौष्ठवाच्या प्रेमासाठी- मधुकर तळवलकर
गेली सहा दशके मी शरीरसौष्ठवाशी बांधील आहे. समाजात फिटनेस विषयी जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून मी तळवलकर क्लासिकच्या नावाने शरीरसौष्ठवाचा मोठा सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याचबरोबर उदयोन्मुख खेळाडूंना आपले ध्येय साध्य करता यावे यासाठी मी सदैव प्रयत्न करीत असतो. यंदा मिश्र जोडीचा फिजिक इव्हेंटही ठेवला गेला आहे. हा इव्हेंट सर्व विवाहित जोडप्यांसाठी प्रेरणादायी ठरावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. आजही अनेकांना फिटनेस क्लब किंवा जिम मध्ये जाणे खर्चिक वाटते. पण तुम्ही एकदा आजारी पडाल तेव्हा तुम्हाला कळेल की आजारपणासाठी किती खर्च होते ते. त्यामुळे फिटनेस हे प्रत्येकाचे दैनंदिन काम व्हायला हवे.
तळवलकर क्लासिकने खेळाचा दर्जा उंचावला
शरीरसौष्ठवाचे पितामह असलेल्या मधुकर तळवलकरांनी तळवलकर क्लासिकचे आयोजन करून खेळाचा दर्जा उंचावला आहे. प्रचंड खर्चामुळे खेळाडू शरीरसौष्ठवापासून दूर होत होते, पण अशा स्पर्धांमुळे नव्या खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळू लागले आहे. ही स्पर्धा शरीरसौष्ठवासाठी एक प्रोत्साहन आहे आणि याचा फायदा थेट खेळालाच होणार आहे.
No comments:
Post a Comment