Monday, September 14, 2015

आनंद शिंदेना लागला ‘जॅकपॉट’

उत्तम निर्मितीमूल्य, कथामांडणी, कसदार कलाकार आणि गीत-संगीताच्या मधुर सुरावटी यांच्या एकत्रीकरणातून निर्मिलेला चित्रपट दर्जेदार ठरणारच यात काही शंका नाही. परंतु त्याच्या जोडीला आज तितकंच महत्त्व चित्रपटाच्या प्रमोशनलासुद्धा आलंय. हीच बाब लक्षात घेत ययाती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत‘जॅकपॉट’ या आगामी धमाल चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते-दिग्दर्शक रवी खिल्लारे यांनी प्रमोशनसाठी एक ठसकेबाज गाणं नुकतंच ध्वनिमुद्रित केलंय.

‘कोंबडा पळाला लंडनला, जॅकपॉट लागणार सगळ्यांना’ असे गमतीशीर शब्द असणाऱ्या या प्रोमोशनल गीतामध्ये चित्रपटाचा सारांश एकवटलेला आहे. महालिंग कंठाळे यांनी लिहिलेले हे धम्माल गीतं नुकतंच आनंद शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजात आजीवसन स्टुडियोमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. उडत्या चालीचं,साउथ टच असलेल्या या प्रोमोशनल साँगद्वारा आनंद दादांच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येणार आहे. दादांच्या आवाजाचा पोत आणि बाज या गीतासाठी एकदम योग्य असल्यामुळे हे गीत आनंद दादांनी गायला हवं यासाठी निर्माते-दिग्दर्शक रवी खिल्लारे आणि संगीतकार निलेश माळी आग्रही होते. हे धमाकेदर गीतं नक्कीच आबाल-वृद्धांना थिरकायला लावेल असा विश्वास निर्माते दिग्दर्शक रवी खिल्लारे यांनी व्यक्त केला. अशा भन्नाट गाण्यांचा जॅकपॉट मला सतत लागो अशी इच्छा व्यक्त करतआनंद शिंदे यांनी निर्माता व संगीतकारांचे आभार मानले.

ओजस पाटील, शंतनू मोघे, अभिषेक यादव-पाटील, जिया चौहान, रुपाली जाधव, या नव्या दमाच्या कलाकारांच्या फळीसोबत उषा नाडकर्णी, अनंत जोग, नागेश भोसले, भाऊ कदम, मौसमी तोंडवळकर, राजेश भोसलेजयराज नायर, राजेश जाधव यांसारख्या अनुभवी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असून ‘जॅकपॉट’ च्या शूटींगला लवकरच सुरुवात होणार आहे. 

No comments:

Post a Comment