Thursday, July 30, 2015

‘चाहतो मी तुला’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
रुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’ हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त वसई-विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. मुहूर्ताच्या वेळी कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी, दिग्दर्शक किर्तीकुमार  आदि मान्यवर चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या मुलाची व मुलीची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात का? त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा चाहतो मी तुला या चित्रपटात पाहता येणार आहे. भरत शहा प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे,

विशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद वैभव परब व महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. राजू लोले यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. 
चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध  केले आहे. चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठेसुलेखा तळवलकर, मेघन जाधवमितीला मिरजकरभारत गणेशपुरेविद्याधर जोशी,आनंदा कारेकर, तेजश्री धरणे या कलाकारांच्या भूमिका आहेत

No comments:

Post a Comment