Wednesday, June 3, 2015

‘मर्डर मेस्त्री’च्या कलाकारांनी साजरा केला ‘दख्खनच्या राणी’ चा वाढदिवस


मुंबई आणि पुण्याच्या लाखो प्रवाशांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या ‘दख्खनच्या राणी(डेक्कन क्वीन)चा ८६ वाढदिवस पुणे रेल्वे स्थानकात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. गेली ८६ वर्ष अखंडपणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या दख्खनच्या राणीच्या वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी उपस्थिती लावली. यावेळी ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी चित्रपटातील वंदना गुप्तेमानसी नाईकहृषिकेश जोशी आदि कलाकार व दिग्दर्शक राहुल जाधव हे आवर्जून उपस्थित होते.

पुणे स्थानकावर प्रवाशांनी व ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटातील कलाकारांनी केक कापून राणीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मर्डर मेस्त्री चित्रपटातील कलाकारांनी ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाबद्दल प्रवाशांशी मोकळ्या गप्पा मारत डेक्कन क्वीनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबीएन्टरप्राईझेस प्रस्तुत 'मर्डर मेस्त्रीहा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

No comments:

Post a Comment