Saturday, June 13, 2015

स्टार प्रवाह वाहिनीवर नवी मालिका : येक नंबर

C:\Users\chavand1\AppData\Local\Microsoft\Windows\Temporary Internet Files\Content.Word\eak noFinal logo_28-5_15.png

२२ जून २०१५ पासून  दर सोमवार - शनिवार   रात्री ९ वाजता

कोल्हापूर, ११ जून २०१५: कॉलेज लाईफ  म्हणजे सळसळता  उत्साह, आनंद, स्वप्ने , आणि महत्वाकांक्षा ! कॉलेज म्हणजे मित्र मैत्रिणीच्या काढलेल्या खोड्या…….लेक्चर बंक करून  चहाच्या टपरीवर केलेल्या टवाळक्या……….चार मित्रांनी शेअर केलेली एक प्लेट भजी..…!कॉलेज म्हणजेच तिच्याकडे किंवा त्याच्याकडे चोरून टाकलेला कटाक्ष.…पिकनिकला केलेली धम्माल……. आणि रात्री जागून केलेली परीक्षेची तयारी ! मज्जा आणि मस्तीने भरलेले ते धम्माल दिवस ! आयुष्यातील अनेक  नात्यांची  सुरुवात  इथेच होते.  जीवाला जीव देणारे मित्रही इथे भेटतात आणि जानी दुश्मनही ! मित्र कधी दुश्मन होतात तर दुश्मनही कधी जीव लावुन जातात !  तरुणाईतील  असेच अनेक रंग घेऊन 'देवा' आणि 'वेदा' स्टार प्रवाह वाहिनीवर "येक नंबर" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २२ जून २०१५ पासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारीत होणार आहे.
'येक नंबर' ही  कहाणी आहे देवा भंडारी आणि वेदा देशमुख या दोन इंजिनिअरींग कॉलेजमधील मुलांची. ‘देवा’ हा शहरातील  श्रीमंत  उद्योगपती  सयाजी भंडारी  यांचा जिद्दी, महत्वाकांक्षी , व्यवहारी आणि बेधडक मुलगा . आयुष्यात भरपुर पैसा आणि नाव कमवायचे हे त्याचे स्वप्न ! देवा पैसा आणि मानसन्मान  कमावण्यासाठी  शिक्षणाची गरज  नाही  असे मानणारा. आपण कोणासाठीही  बदलायच नाही हे त्याच्या आयुष्याचे धोरण !  या शहरातील   इंजिनिअरींग कॉलेजमध्ये त्याचे वडील ट्रस्टी आहेत. हे कॉलेज पाडून त्या जागी मोठा मॉल बांधण्याचे त्याची योजना आहे .
देवाच्या  अगदी  उलट  ‘वेदा’ ! मध्यमवर्गीय  विजय  देशमुख यांच्या घरातील  वेदा  ही आधुनिक विचारांची, आत्मविश्वासू मुलगी आहे. तिचे ठाम मत आहे की शिक्षण ही यश मिळवण्याची पहिली पायरी आहे आणि माणुस शिक्षणानेच परिपूर्ण होतो. तिला स्वतःला काळाप्रमाणे बदलायचं आहे. तिला माहित आहे, स्वतः बदलाल.. तर जग बदलेल.  ऑटोमोबाईल इंजिनिअर होऊन खुप नाव कमवावे हे तिचे स्वप्न आहे.  खूप कष्टाने आणि स्व-कमाईने  तिने इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे.  परंतु वेदासुद्धा देवाईतकीच जिद्दी, महत्वाकांक्षी आहे.  या दोघांचे ध्येय एकच - आपली स्वत:ची ओळख निर्माण करणे.  अशा या दोन टोकांच्या व्यक्ती एकाच कॉलेजमध्ये आमने-सामने येतात.
‘येक नंबर’ मालिकेतून नवोदित चिराग पाटील आणि माधुरी देसाई छोट्या  पडद्यावर पदार्पण करीत आहेत. या नवोदितांबरोबर  रिषी देशपांडे, शर्वाणी पिल्ले, तन्वी मालपेकर, अक्षय केळकर हे कलाकार भूमिका करणार आहेत. या मालिकेचे  निर्माते सचिन मोहिते आहेत तर दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे.
देवाची  कॉलेज पाडण्याची योजना सफल होईल का? वेदा कॉलेज वाचवू शकेल का? कसे असेल  'देवा'  आणि 'वेदा' यांचे नाते ?  पाहायला विसरू  नका –
"येक नंबर"  २२ जून २०१५ पासून रात्री ९ वाजता
फक्त स्टार प्रवाहवरNo comments:

Post a Comment