यंदाच्या सुट्टीत बच्चेमंडळीसाठी झी टॉकीज डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांचीखास भेट घेऊन आली आहे.मराठी मनोरंजनाच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेत डब केलेले डिस्नेचे धमाल चित्रपट झी टॉकीजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. त्यातलाच पुढचा चित्रपट ‘सिंड्रेला III अ ट्वीस्ट इन टाईम.
लहानांना वेड लावणार्या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्या परिराणीच्या स्वप्नांच्या-जादूनगरीतसिंड्रे ला सर्वांना लवकरच घेऊन जाणार आहे. कजाग सावत्र आई आणि बहिणींच्या कचाट्यात अडकलेली सालस सिंड्रेलाची कथा सगळ्यांना माहित आहेच. सिंड्रेलाच्या दुःखावर प्रेमळ फुंकर घालणाऱ्या गॉडमदरच्या जादुई छडीने राजकुमाराची राणी होण्याचे भाग्य तर तिला लाभतं. पण तिचे हे सुख तिच्या आई आणि बहिणींना पाहवत नाही. सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांचा प्रेमळ सहवास पाहू न शकणाऱ्या तिच्या आई आणि बहिणी नेहमीच काही ना काही कट रचत असतात. आपल्या मुलीचे प्रिन्स चार्मिंगशी लग्न लावून देण्याचे सिंड्रेलाच्या आईचे स्वप्न पूर्ण होते का...? सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंगचे प्रेम जिंकते की दुष्ट आई-बहिणींची कारस्थाने फळास येतात हे पाहणं उत्कंठा वाढवणारे आहे.
येत्या रविवारी १० मेला झी टॉकीजवर ‘सिंड्रेला III अ ट्वीस्ट इन टाईम’ या अॅनिमेशनपटाद्वारे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता या चित्रपटाचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. विशेष म्हणजे गुण्यागोविंदाने राजपुत्राबरोबर राज्य करणारी अत्यंत नाजूक व मोहक राणी 'सिंड्रेला'ला केतकी माटेगावकरने आपलं मंजुळ आवाज दिला आहे.झी टॉकीजने आणलेली चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. झी टॉकीजवरील या फिल्म्समुळेछोट्या दोस्तांची यावेळची सुट्टी आणखीनच बहारदार झाली आहे.
झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला आहे. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपट, अनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सव, कॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे दैदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.
वैविध्यपूर्ण मनोरंजनाची ही वैभवशाली परंपरा जोपासत झी टॉकीज या सुट्टीत आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक खास आश्चर्यकारक भेट घेऊन दाखल होतेय. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे. मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजच्या आजवरच्या प्रवासातला आणखी एक परमोच्च बिंदू ठरेल अशी आशा आहे. असे झी टॉकीज चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले.
डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चे चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यासठी डिस्ने आणि डिस्ने पिक्सार ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन ने आजवर आपले सर्वाधिक कार्यक्रम वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केले आहेत. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन चे १३,००० प्लॅटफॉर्म पार्टनर २४० प्रभागात हे कार्यक्रम जगभरात प्रसारित करतात. डिस्ने मिडिया डिस्ट्रीब्युसन भारतातल्या वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करते.
No comments:
Post a Comment