Saturday, May 30, 2015

'फिरोदिया’ करंडकाच्या यंदाच्या विजेत्यांना 'सुबक' ची साथ









 पुण्याच्या कॉलेज लाईफमध्ये महत्वाच्या मानल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये फिरोदिया करंडकस्पर्धा अग्रगण्य स्थानावर आहे.ही पुण्यातलीएकनावाजलेली आंतरमहाविद्यालयीनस्पर्धा आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित केली जाणारी'फिरोदिया करंडक स्पर्धा'महाविद्यालयीन युवा पिढीच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठीचे दर्जेदार व्यासपीठ बनले आहे. या स्पर्धेत नाट्याविष्कारासह इतर कला लाइव्ह पाहण्याचाआनंद घेता येतो.
 फिरोदिया'च्या माध्यमातून अनेक कलाकारांनी व्यवसायिक रंगभूमीचित्रपट आणि अन्य माध्यमात यशस्वी कारकीर्द केली आहे. या युवा कलाकारांना कलाक्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. यंदाच्या करंडकाचा मान पटकवणाऱ्याव्ही.आयटी महाविद्यालयाच्या ‘पाणी’व फर्ग्युसनमहाविद्यालयाच्या ‘विठा’या एकांकिकांचेप्रयोगमुंबईकरांना पाहता येणार आहेत. यासाठी अभिनेता सुनील बर्वे यांनी पुढाकार घेतला आहे.याकरिता वेलोसिटी व्हेंचर, ड्रीम २ रीअॅलिटी व स्पेशल व्हिजन या संस्थेचे सहकार्य ‘सुबक’ ला मिळाले आहे.
 याआधी अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या ‘सुबक’ संस्थेतर्फे हर्बेरियम सारखा एक उत्तम उपक्रम आणला होता.सुनील बर्वे यांच्या 'सुबकया संस्थेतर्फे या एकांकिकांचे दोन प्रयोग मुंबई ठाण्यात आयोजित केले जाणार आहेत. विविध कलांचा हा नेत्रदीपक कोलाज पाहण्याची संधी मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पहिल्यांदाच चालून आली आहे.६ जूनला याचा पहिला प्रयोग यशवंत नाट्य मंदिर माटुंगा दुपारी ४ वाजता व डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे रात्रैा ८.३० वाजतारंगणार आहे. याची तिकीट विक्री ३ जून पासून थिएटरवर सुरु होणार आहे.
 ‘पाणी’ या एकांकित नक्षलींचा वावर असणाऱ्या गावातील कथा. या भागातील पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर भाष्य करण्यात आले आहे. तर ‘विठा’या एकांकित तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment