Friday, May 15, 2015

‘वाल्या टू वाल्मिकी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
           मराठी रुपेरी पडद्यावरच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या प्रभावी निर्मितीला प्रेक्षकवर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. वाल्या टू वाल्मिकी हा असाच एक वेगळा आशयघन चित्रपट निर्माते श्रीकांत शेणॅाय व कार्यकारी निर्मात्या शुभांगी शेणॅाय घेऊन येत आहेत.

श्रीकांत शेणॅाय निर्मित संजय कसबेकर व पंकज भिवाजी दिग्दर्शित वाल्या टू वाल्मिकी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झाला. विचित्र परिस्थितीत अडकलेल्या माऊली या मुलाची ही कथा आहे. माऊलीच्या प्रवासात त्याला अनेकजण भेटतात. या सगळ्यांमुळे माऊलीच्या आयुष्याला कलाटणी मिळते. या कलाटणीमुळे माऊलीच्या आयुष्याला दिशा मिळणार की तो दिशाहीन होऊन भरकटत जाणारयाची भावस्पर्शी कथा आपल्याला
‘वाल्या टू वाल्मिकी  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा व संवाद मनिष कदम यांचे आहे. गीते प्रवीण दामले यांची असून अश्विन भंडारे यांनी संगीत दिले आहे. गायक आदर्श शिंदे व अश्विन भंडारे यांनी या चित्रपटातील गीते गायली आहेत.या चित्रपटाचे छायाचित्रण राज रेवणकर यांनी केलं आहे. वर्णन पिक्चर्स बॅनरखाली तयार होणाऱ्या वाल्या टू वाल्मिकी  या चित्रपटात मिलिंद शिंदे,संजय खापरे पंकज विष्णूमौसमी तोंडवळकर,  संजय कसबेकरमास्टर वरुण दामोदर बाळीगा यांच्या भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment