Tuesday, April 28, 2015

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने ग्लोबल कोकण जागतिक महोत्सवाचे आयोजन



कोकणात आभाळाशी सपर्धा करणाऱ्या हिरव्याकंच नारळी पोफळीच्या बागा, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या आमराई, अथांग समुद्र किनारे, रुपेरी वाळूचे किनारे, शिताफीने मासेमारी करणारे कोळी बांधवआणि संस्कृती जतन करणारा कोकणी माणूस अशी एक ना अनेक विशेषणं कोकणाला लावता येईल. निसर्ग समृद्धतेबरोबरच कोकणाला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोकणी माणसाने या संस्कृतीचे व परंपरांचे पूर्वापार जतन करत आले आहेत, पण धकाधकीच्या जीवनात आणि नोकरी–धंद्याच्या शोधात अनेक कोकणवासीय मुंबईत व अन्य भागात स्थलांतरित झाले. या सगळ्यांना पुन्हा एकदा कोकणात फिरवून आणण्याची जबाबदारी घेतली आहे कोकण भूमी प्रतिष्ठानने. अर्थात त्यासाठी कोकणात न जाता गोरेगावात नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर, ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान यावं लागेल. या ठिकाणी भव्य दिव्य अशा ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या महोत्सवासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघात, पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला ग्लोबल कोकण महोत्सवाचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार, स्वागताध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि कार्याध्यक्ष संजय यादवराव उपस्थित होते.
गेली ४ वर्ष मुंबईत यशस्वीरीत्या ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, यंदाचे ग्लोबल कोकण महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात उत्तुंग ते अथांग नावाचं भव्य पर्यटन दालन उभारण्यात येणार आहे. मालवण मधील स्क़ुबा डायहींग प्रकल्प, समुद्रातील डॉल्फिन, किंगफिशर, दुर्मिळ ओलीव रिडले कासव प्रजनन, रुपेरी सागर किनारे, बॅकवॉटस, सह्याद्रीची जैव विविधता, ग्रामीण संस्कृती अशी अनेक आकर्षणे कोकणात आहेत. यातून लाखो पर्यटक कोकणात यावेत व समृद्ध निसर्ग ग्रामजीवनाचा आनंद पर्यटकांना मिळावा असा प्रयास आहे. खेड, चिपळूण, सिंधुदुर्गात इन्सुली येथे आढळणाऱ्या ‘मगरी’ हे या वर्षीच्या ग्लोबल कोकणचे खास आकर्षण असणार आहे असे आमदार भाई जगताप यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकणातील अनेक होमस्टे, महाभ्रमन, कृषी पर्यटन, हॉटेल रिसॉट उद्योजक, कोकणातील उद्यान्मुख व आंतरराष्टीय कीर्तीच्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून भव्य कलादालन यावेळी उभारण्यात आले आहेत असे संजय यादवरावांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले. कोकणच्या क्षमताचे दर्शन या कलादालनात होणार आहे. या कालाकृतींची विक्री यावेळी केली जाईल. आंतर महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धा, शालेय विदर्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, लघुपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा असे अनेक उपक्रम या वेळी आयोजित करणार आहेत. या ग्लोबल कोकण महोत्सवात कोकणातील अनेक उद्योजक आपआपल्या प्रकल्पांची माहिती देणार आहेत, त्याचबरोबर शासनाचे विविध उपक्रम, योजना यांची माहितीही प्रदर्शित केली जाणार आहे, असेही यादावरावांनी सांगितले.
कोकणातील खाद्य पदार्थ व उत्पादनांचे भव्य कोकण खजिना दालन हे खास आकर्षण असणार आहे. जगभर प्रसिद्ध असलेले कोकणी खाद्य पदार्थ मोदक, थालीपीठ, सागुती वडे, माश्यांचे विविध प्रकार, कोळी सारस्वत, भंडारी, मराठा, ब्राम्हण विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती दर्शविणारा कोकणी फूड फेस्टीवल या महोत्सवाचा मुख्य आकर्षणाचा विषय आहे. या महोत्सवामध्ये कोकणातील लोककला नृत्यस्पर्धा, फोटोग्राफी, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्लोबन कोकण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते कोकण आयडॉल पुरस्कार. शेती, सामाजिक, उदयोग शेत्रात विशेष काम करणाऱ्या कोकणवासीयांच्या कोकण आयडॉल म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात महाराष्ट्र दिनानिमित्त सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांनी साकारलेला मराठी गीतांचा कार्यक्रम ‘मराठी अभिमान गीत – एक आनंदयात्रा’ आयोजित करण्यात आला आहे, अशा प्रकारे कार्यक्रमाची सूचीही या पत्रकार परिषदेत संजय यादावरावांनी जाहीर केली.

No comments:

Post a Comment