Saturday, April 18, 2015

‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग'


दुसऱ्या पर्वाची घोषणा, पाचगणी येथे रंगणार सामने















क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जणू जीव की प्राण..कलाकारमंडळी सुद्धा त्याला अपवाद नाही, मात्र आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांना क्रिकेटची आवड जपायला वेळ मिळतोच असं नाही, नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महराष्ट्र कलानिधीचे संस्थापकश्रीनितेश राणे आणि सचिव श्रीसुशांत शेलार यांनी एकत्र येत ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग'ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वीकरून दाखवलं. आता‘मराठी'बॉक्स क्रिकेट लीग'च्या दुसऱ्या पर्वाची घोषणाकरत पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाला क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.एमबीसीएलच्या माध्यमातूनकलाकारांचेदहा संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत.

‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' च्या दुसऱ्या पर्वाचीघोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतनितेश राणे, सुशांत शेलारआणि मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्यावर्षी ८ गटांमध्ये हे सामने रंगले होते.यंदा ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ अशा दोन नव्या संघाच्या सहभागाची घोषणा आणिसंघांच्या टीशर्टचे अनावरण यावेळी करण्यात आले.‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग'चेदुसरं पर्व ८ ते १० मे दरम्यान पाचगणी येथे रंगणार आहे.उपस्थित सर्व संघांना नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दोन नव्या संघाच्या शिलेदारांचे स्वागत करत दुसरं पर्व आपणही एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं.

‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग’ मध्ये‘शिलेदार ठाणे’, ‘कोहिनूर नागपूर’,‘डॅशिंग मुंबई’, ‘रत्नागिरी टायगर्स’, ‘शूर कोल्हापूर’, ‘मस्त पुणे’, ‘क्लासिक नाशिक’,’फटाका औरंगाबाद’,‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ हे दहा संघ सहभागी होणार आहेत. चौकार षट्कारांचीआतषबाजी करायला कलाकारमंडळी सुद्धा सज्ज झाली आहेत.’मराठी 'बॉक्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सीझनची धमाल झी टॉकीज वर पाहता येणार आहे.

No comments:

Post a Comment