Tuesday, February 17, 2015

Star Pravah's forthcoming show 'Tu Jivala Guntavave'

प्रेमात खरेपणा असेल तर कुठलेही खोटे आपलेसे होते.

२३ फेब्रुवारी २०१५ पासून दर सोमवार ते शनिवार  रात्री ९ वाजता

मुंबई,१६ फेब्रुवारी २०१५ : तुम्ही कधी आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी  खोटे  बोलला आहात का ?

कधीतरी नक्कीच बोलला असाल, नाही  का ? कधी सहज म्हणून …कधी  गमंत म्हणून.…तर कधी त्याला

किंवा तीला  इंप्रेस करण्यासाठी…… प्रेमात एखादी थाप तर चालून जाते ना !. पण खोटे बोललात म्हणून

तुमच्यातले प्रेम कमी होते का? नाही ना, कारण बोलण्यातील खोटेपणापेक्षा तुमच्या प्रेमातील खरेपणा

अधिक महत्वाचा असतो! आणि तसेही कुणीतरी म्हटलेच आहे की 'युद्धात  आणि प्रेमात सगळे काही

माफ असते बॉस' ! तर याच  आधुनिक  फिलासॉफीवर विश्वास ठेवणारी एक मुलगी आणि आजच्या

काळातही सत्याची कास धरणारा एक मुलगा एकत्र आले तर काय होईल ?  कशी असेल त्यांची प्रेमकथा

? काय वाचतानाच गंमत वाटली ना ? प्रेमाची हीच गमंत जंमत  तुम्हाला पाहायला  मिळणार आहे स्टार

प्रवाहवरील ‘तु जिवाला गुंतवावे’ या  नवीन मालिकेतून. २३ फेब्रुवारी २०१५ पासून दर सोमवार ते शनिवार

रात्री ९ वाजल्यापासून प्रेक्षकांना ही मालिका गुंतवुन ठेवणार आहे.

'तु जिवाला गुंतवावे'  ही  प्रेमकथा आहे अनन्या (शिवानी सुर्वे)  आणि निनाद( प्रसाद लिमये) या दोघांची.

अनन्या एक बडबडी ,जुगाडू  आणि तेवढीच महत्वाकांक्षी  मुलगी. तर निनाद एक साधा सरळमार्गी आणि

शांत मुलगा. असे हे दोन ध्रुव एकत्र आल्यावर काय गुंता होतो याची कहाणी म्हणजे  'तु जिवाला गुंतवावे'

या मालिकेच्या निमित्ताने  बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रमिंग हेड जयेश पाटील म्हणाले की, " मराठी स्त्री

प्रेक्षकवर्गाला त्याच-त्याच मनोरंजनाचा कंटाळा आलाय. वेगळ्या कथा, व्यक्तिरेखा  आजच्या स्त्रीला

टीव्हीवर पाहायच्या  आहेत. शेकडो पत्रे,ईमेल्सच्या माध्यमातून त्यांनी ही आग्रही  मागणी आमच्याकडे

केली आहे. त्यामुळे आम्हीदेखील नवनवीन प्रयोग सादर करीत आहोत. आम्हाला खात्री आहे की, तरुण

आणि मनाने तरुण असणाऱ्या प्रेक्षकांना ही कथा नक्कीच आवडेल."

No comments:

Post a Comment