Wednesday, February 25, 2015

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकरांनी घेतली महापौरांची व सहाय्यक पोलिस आयुक्त रुपवते यांची भेट

Displaying DSC_0816.jpg

'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष विजय पाटकर व त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौर स्नेहल आंबेकर व सहाय्यक पोलिस आयुक्त राजदूत रुपवते यांची भेट घेतली. रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी पालिका रुग्णालयात स्पेशल वॉर्ड मध्ये २ जागा आरक्षित असतात त्याचप्रमाणे दोन जागा मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी आरक्षित केल्या जाव्यात असे 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'तर्फे अध्यक्ष विजय पाटकर यांनी महापौर मुंबई महानगरपालिका यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाचा स्विकार करत महापौरानी या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन अध्यक्ष विजय पाटकर यांना दिलं  आहे.
 
मराठी सिनेमा अधिकाअधिक समृद्ध होऊ लागला असतानाच चित्रपटांच्या पायरसीची समस्या ही दिवसेंदिवस गहन होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस आयुक्त राजदूत रुपवते यांची ही सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी या समस्येवर चर्चा करून ती सोडवण्यासाठी उपायांवर विचारविनिमय यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे या दोन्ही बाबींचा योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे अध्यक्ष विजय पाटकर यांनी स्पष्ट केलं आहे.     

No comments:

Post a Comment