Thursday, January 15, 2015

'क्लासमेट्स'चा कल्ला

कॉलेज गॅण्गज् आणि हुल्लडमस्ती समीकरणच. त्यांचा रोमांचकारी उत्साह.. त्यांच्या स्वप्नांची भरारी घेणारी उड्डाणं पाहताना आपल्यालाही गतकाळात रमायला भाग पाडतात. असाच कल्ला 'क्लासमेट्स'मधील ग्रुपने चित्रपटात तर केली आहेच पण प्रसिद्धीदरम्यान पुन्हा एकत्र आलेल्या या 'क्लासमेट्स'नी मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. पतंग बनवण्यापासून त्याला मांजा बांधताना केलेली मस्ती, पतंग उडवणं आणि पतंग काटाकटीसाठी एकमेकांशी लागलेली स्पर्धा ही मजा काही औरच होती. 'म्हाळसा एंटरटेनमेन्ट' निर्मित, 'व्हिडीओ पॅलेस' चे नानूभाई जयसिंघानी 'एस. के. प्रॉडक्शन्स फिल्म'चे कोमल व संदीप केवलानी प्रस्तुत आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'क्लासमेट्स' कॉलेजच्या आठवणीत जपलेल्या त्या हळुवार अनुभवांचा, जीवाभावाच्या मित्रांची गोष्ट सांगणारा, 'फ्लॅश बॅक' मध्ये घेऊन जाणारा.. चित्रपट येत्या १६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. 
No comments:

Post a Comment