Tuesday, December 2, 2014

प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा ‘लव्ह फॅक्टर’

आज मराठी सिनेमाकडे तरूणाई मोठ्या प्रमाणात वळताना दिसते आहे. त्यांचाच विचार करून अनेकविध नवे आणि तरूणाईच्या मनाला भिडणारे विषय घेऊन प्रतिभावंत दिग्दर्शक-लेखक सिनेमे तयार करीत आहेत. या सिनेमांमधून मनोरंजनाबरोबरच तरूणाईला काही मॅसेज देण्याचेही काम केले जात असून त्यालाही तरूणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेम हा तरूणाईचा आवडता विषय...पण प्रेमाची व्याख्याच अलिकडे बदलल्याची दिसून येते. ख-या प्रेमाचा शोध घेणारी आणि प्रेम म्हणजे त्याग याचा शोध घेणारी अशीच एक रोमॅंटिक कथा ‘लव्ह फॅक्टर’ या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. प्रेमाची खरी परीभाषा सांगणारा हा सिनेमा आहे असे एका वाक्यात म्हणता येईल. मुक्ताई फिल्म प्रोडक्शनच्या मुकुंद सातव यांचा हा निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा असून ‘डोलकीच्या तालावर’ या सिनेमानंतर लेखक-दिग्दर्शक किशोर विभांडिक यांचा हा दुसरा सिनेमा आहे. येत्या १२ डिसेंबरला ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रदर्शित होत आहे.

आजची तरूण पिढी ख-या प्रेमाला पोरकी झाली आहे, त्याग म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग अशी खरी प्रेमाची व्याख्या सांगणारा हा सिनेमा आहे, आजचा तरूण वर्ग प्रेमाची त्यांना भलतीच विचित्र तयार केली आहे, केवळ शारिरीक आकर्षण, सौंदर्य यापलिकडे खरं प्रेम म्हणजे आज अभावानेच पाहायला मिळतं, अश्याच विषयावर भाष्य करणारा ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा आहे. या धमाल सिनेमात मराठी-हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता राजेश शृंगारपुरे प्रथमच रोमॅंटीक भूमिकेत दिसेल त्याच्या सोबत खुशबू तावडे, कुशल बद्रिके, हर्षदा भावसार, प्रतिभा भगत हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमाबद्दल सांगाताना दिग्दर्शक किशोर विभांडिक म्हणाले की, "आजच्या तरूणाईला हा विषय खूप आवडेल. त्यांचं मनोरंजन तर होईलच शिवाय मॅसेजही मिळेल. निर्माते मुकुंद सातव यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच हा सिनेमा मी चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकलो". तर निर्माते मुकुंद सातव म्हणाले की, "दिग्दर्शक किशोर विभांडिक यांच्यासारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांमुळे मला पहिल्यांदाच इतका चांगला आणि तरूणाईच्या आवडत्या विषयावर सिनेमा करण्याची संधी मिळाली". 

प्रेमाची वेगळी व्याख्या सांगणा-या ‘लव्ह फॅक्टर’ या सिनेमाची लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली असून मुकुंद सातव हे निर्माते आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मयुरेश जोशी, नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे आणि चेतना सिंग, कला दिग्दर्शन नझीर शेख, निर्मिती व्यवस्थापन अजय सिंग, गीतकार मंगेश कांगणे यांच्या अर्थपूर्ण शब्दरचनेवर चिनार-महेश या प्रतिभावंत व धमाल संगीतकार जोडीने अतिशय रोमॅंटिक आणि सुमधूर असे संगीत दिले आहे. हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

No comments:

Post a Comment