Friday, July 4, 2014

'शॉर्टकट' च्या चित्रीकरणास प्रारंभ चित्रपटातून सायबर क्राइमवर प्रकाशझोत'शॉर्टकट' च्या  चित्रीकरणास प्रारंभ
चित्रपटातून सायबर क्राइमवर प्रकाशझोत
वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे सध्या मराठीत येऊ घातलेत. असाच वेगळ्या आशयाचा 'शॉर्टकट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या चंगळवादी संस्कृतीमुळे युवापिढी यश मिळवण्यासठी कोणताही  'शॉर्टकट' अवलंबायला मागे पुढे पहात नाही, पण हाच 'शॉर्टकट' कधीतरी वेगळं वळण घेतो; आणि त्याचे परिणाम सगळ्यांनाच  भोगावे लागतात. सध्याचा सायबर क्राइम सारखा अत्यंत ज्वलंत विषय या चित्रपटातून हाताळण्यात आला आहे. 
      
उदयोन्मुख तरुणांची फळी चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करून नवनव्या कल्पना घेवून चित्रपट तयार करतायेत.अशांपैकीच जाहिरात आणि मालिकांसाठी काम केलेल्या हरीश राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्यांचा हा पाहिलाच मराठी सिनेमा आहे. यात राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुडे, नरेश बिडकर , योगिता परदेशी, उदय नेने, सायली काळे  या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. ‘एम के मोशन पिक्चर्स’ चे मुकेश चौधरी यांनी या चित्रपटची निर्मिती केली असून कथा पटकथा दिग्दर्शक हरीश राऊत यांचीच आहे. संवाद विनय नारायण यांनी लिहले  आहेत. या चित्रपटातून रॉक संगीताचा दमदार तडका अनुभवता येणार आहे. हे रॉकिंग गाणं सुशांत शंकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.या गाण्याचं  नृत्यदिग्दर्शन रेमो डिसूझा यांचे सहाय्क जीत सिंग याचं आहे. या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचं संगीत निलेश मोहरीर याच आहे. हे प्रेम गीत असून त्याचं नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे. 
    
कर्जतच्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूल  मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून चित्रिकरणाचं १३ दिवसाचं  पाहिलं सत्र संपत आलं असून जुलैं महिन्यात दुसऱ्या सत्राच्या चित्रीकरणाला  प्रारंभ होईल.

No comments:

Post a Comment