Tuesday, June 3, 2014

HUTUTU Release on 6th June

मनोरंजनाच्या मैदानात प्रेमाचा 'हुतूतू' जूनला चित्रपटगृहात










नाती मनाला विश्वास देणारी, जीवनात येणाऱ्या प्रसंगाला नव्या उमेदीने बळ देणारी.. पण कधीतरी आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना घडतात कि, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दरी निर्माण होऊ शकते. असे झाले तर आयुष्याच्या पटलावर खेळाचा आखाडा व्हायला वेळ लागत नाहीनातेसंबंधातील अशाच भन्नाट डावपेचावर बेतलाय कांचन
अधिकारी दिग्दर्शित 'हुतूतूहा धम्माल विनोदी चित्रपटखेळ तसा जुनाचपण रोज नव्यानेनव्या मातीवर रंगणारा...
हर्षवर्धन भोईर  भाऊसाहेब भोईर निर्मित हा मनोरंजक चित्रपट येत्या जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'हर्ष फिल्मस'
निर्मित या सिनेमात खेळाचा आखाडा नसला तरी प्रेमाच्या नात्यांची अनोखी धोबीपछाड पहायला मिळणार आहे


मराठीतील अनेक नामांकीत कलाकार 'हुतूतू' चित्रपटात एकत्र आले असून दिग्दर्शिका कांचन अधिकारी सुद्धा बऱ्याच कालावधीनंतर यात अभिनय करताना दिसणार आहेत. यात अशोक सराफवर्षा उसगांवकर,जितेंद्र जोशी
हेमंत ढोमेनेहा पेंडसेमानसी नाईकअनंत जोगप्रदीप पटवर्धनजयवंत भालेकरअतुल तोडणकरसंजय खापरे 
आणि कांचन अधिकारी अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. खेळ आणि जीवन यात बऱ्याचदा साम्य पहायला मिळतं, तेच आपल्याला यात पहायला मिळणार आहेत्याग, समर्पणाला प्रेम मानणाऱ्या जुन्या पिढीचा एक संघ आणि प्रेम
मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नव्या पिढीचा दुसरा संघ. दोन पिढ्यांतील हा संघर्ष 'हुतूतू' सिनेमातून
आपल्यासमोर विनोदी ढंगात उलगडणार असून आशिष पाथरे यांनी त्याचे लेखन केलंयएकमेकांचा पाय खेचत,
परस्परांचा डाव उधळत, नव्या चाली रचत हा चुरशीचा सामना खेळला जातो. यात विजय कोणाचा होतो?  कसा होतो? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पहायलाच हवा

मनोरंजनाचे परिपूर्ण नाट्य असलेल्या या चित्रपटाची गीते प्रकाश राणे यांनी लिहिली असून हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार आनंद राज आनंद यांनी संगीत दिलंयतर पार्श्वसंगीताची साथ नितीन हिवरकर यांनी दिली आहे. वैशाली 
सामंत, विशाल मिश्रा, ऐश्वर्या निगम, अर्पिता चक्रवर्ती, भरत गोएल या गायकांच्या सुमधूर आवाजात ती स्वरबद्ध 
करण्यात आली आहेत. या ध्वनीफितीत 'हुतूतू' हे शीर्षक गीत,'लाडीगोडी'  'लैला मेरी लैला' या तीन गीतांसोबत संगीतकार आनंद राजआनंद यांचे संगीत असलेल्या लोकप्रिय हिंदी गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. यात माही वे 
(कांटे), दिल दे दिया है (मस्ती), जाने क्या होगा रामा रे (कांटे), शकीला बनो (जंजीर), जुल्मी जुल्मी (ग्रॅंड मस्ती) 
आणि आनंद राज आनंद यांनी लिहिलेल्या जलेबी बाई (डबल धमाल) या ताल धरायला लावणाऱ्या गीतांचा समावेश 
आहे. कला दिग्दर्शन राजू साप्ते, छायांकन सुरेश देशमाने, संकलन आनंद दिवाण यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव  दिलीप मिस्त्री यांनी केलंयप्रेमाच्या मैदानात रंगलेला 'हुतूतू'चा विनोदी सामना प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. येत्या  जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय

No comments:

Post a Comment