Friday, May 23, 2014

Tirupati Balaji Group is now in film production
Tirupati Balaji Group is now in film productionTirupati Balaji Group is a leading name in Property Builders, took a step ahead in an entertainment field as TIRUPATI BALAJI MOTION PICTURES. Recently in a grand function, Shri Mahendra Pawankumar Singh the founder of Tirupati Balaji Group, revealed that through Tirupati Balaji Motion Picture he is widening his bussiness in cinema productions. The logo of TBMP was launched in this function as well as the first Marathi Cinema 'KAV KAV KAWLE' is sooner to be released under the banner of TBMP.

A reputed name as property builders, Tirupati Balaji is now ready to succeed in entertainment field and aims to innovative ideas in creations of regional films. Many of the deligates and artists of the Marathi film 'Kav Kav Kawle' were present and witnessed the first glance of the film.

 The main attraction of this film is that after a long period the amazing voice of our beloved ASHA TAI will be heard in this film and Vaishali Samant as music Directer . Kav Kav Kawle is based on anti social subject. Nilesh Sable, Vijay Chavhan, Arun Nalawde, Vidyadhar Joshi, Saksham Kulkarni , MIlind Shinde, Dhanashree Kadgaonkar are featured in this picture. TBMP is also aheading to produce films in other regional languages. 

'तिरुपती बालाजी ग्रुप' आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात
'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स' चे शानदार पदार्पण 

बांधकाम व्यवसायात अग्रगण्य  नाव असलेल्या 'तिरुपती बालाजी ग्रुप' ने  मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करत उत्तम चित्रपट निर्मितीचा मानस व्यक्त केला  आहे. या  बाबतची  घोषणा  नुकतीच  एका  शानदार  कार्यक्रमात करण्यात आली. माननीय श्री. महेंद्र पवनकुमार सिंह हे 'तिरुपती बालाजी ग्रुप'चे संस्थापक तसेच सर्वेसर्वा असून कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर देखील आहेत. आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदाविण्यासाठी त्यांनी 'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स' (TBMP) च्या माध्यमातून चित्रपट निर्मिती व्यवसायात प्रवेश केला आहे. याप्रसंगी 'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स'च्या लोगोचे अनावरण ही करण्यात आले असून 'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स'  तर्फे 'काव काव  कावळे' या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मितीची घोषणा करण्यात आली. लवकरच हा धमाल चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

बांधकाम व्यवसायात नाव कमावल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात ही यशाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी 'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स' सज्ज झालं आहे. महेंद्र पवनकुमार सिंह यांनी ही धुरा उचलली असून मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करण्याची  इच्छा  त्यांनी यावेळी व्यक्त  केली.  या  कार्यक्रमाला 'काव काव कावळे' या चित्रपटातील कलाकार व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. 'काव काव कावळे' चित्रपटाची पहिली झलक ही या कार्यक्रमात दाखवण्यात आली. 'काव  काव कावळे' चित्रपटाच वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मराठी चित्रपटातून आशातांईचा सुमधुर स्वर ऐकायला  मिळणार आहे. शिवाय या सिनेमातून वैशाली सामंत संगीतकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. 'काव काव कावळे' हा सामाजिक अवमुल्यनावर भाष्य करणारा सिनेमा असून निलेश साबळे, विजय चव्हाण, अरुण नलावडे, विद्याधर जोशी, सक्षम कुलकर्णी, मिलिंद शिंदे, धनश्री कडगांवकर हे लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   

मराठी चित्रपटाप्रमाणे अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची निर्मिती ही 'तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स' यांच्या वतीने आगामी काळात करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment