Thursday, May 29, 2014

Dhabal episodes to be on air on 2nd & 3rd June 2014. 

मुंबई, २९ मे २०१४:उचकी लागली तर काय होते ? उचकी जाईपर्यंत ती व्यक्ती अस्वथ्य  होते . त्या व्यक्तीचा  जीव कासावीस होतो. पण उचकी हा  संसर्गजन्य  रोग  असतो का? काय तुमचं उत्तर नाही असं आहे ? मग तुम्ही स्टार प्रवाहावरील ढाबळीत जरा डोकावुन पहा. विश्वास बसत नाही ना ? अहो पण ढाबळीत काहीही होवू शकते.स्टार प्रवाहवरील ढाबळ -एक तास टाईमपास या मालिकेत कवियत्री लिली(रसिका आगाशे) , काणे काका (विजय पटवर्धन)आणि स्वप्नील जोशी यांना उचकीची सांसर्गिक लागण झाली आहे. आणि ही उचकी साधी-सुधी नाही , तर  ती थेट दक्षिण आफ्रिकेतून ढाबळीत आली आहे. तर या अश्या उचकीवर उपाय करताना काय काय धमाल उडते आणि अखेर कोणता उपाय या उचकीवर लागू पडतो ते २ जून २०१४  रोजी प्रसारित होणाऱ्या भागातआपण पाहू शकता.
३ जून २०१४ च्या भागात अशी व्यक्ती  ढाबळीत येणार आहे ,जीने  चित्रपट आणि रंगमंच या दोन्ही ठिकाणी आपल्या  अभिनयाने एक वेगळा ठसा उमटवला , जिच्या अभिनयाचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला अशी समस्त मराठी प्रेक्षकांची लाडकी आणि  स्वप्नीलची जिवलग मैत्रीण  सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे . या कार्यक्रमात मुक्ताने स्वप्नील जोशी  बरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. तसेच  या कार्यक्रमात मुक्ताचे  अजून एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे.  ढाबळीत तिने स्वत: रचलेल्या काही कविता सादर केल्या आहेत.  स्वप्नील आणि मुक्ता यांच्या अभिनयाने नटलेला ,'२०१३ या वर्षातील  एक उत्कृष्ट  आणि सुपरहिट चित्रपट  मंगलाष्टक -वन्स मोअर' लवकरच स्टार प्रवाहवर  वर्ल्ड  टेलिव्हिजन  प्रिमिअर  अंतर्गत प्रसारित  होणार  असल्याची घोषणा स्वप्नीलने  या कार्यक्रमात केली आहे. या  गप्पांच्या ओघात मुक्ताने आपण प्रेमात पडल्याची देखील कबुली दिली आहे. कोण आहे तिचे प्रेम हे जाणून घेऊया ३ जून२०१४ रोजी .
तर आठवड्याच्या सुरवातीलाच होऊया रिफ्रेश , विसरून जाऊ टेन्शन आणि त्रास  करूया  एक तास टाईमपास
दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता ढाबळ -एक तास टाईमपास
फक्त स्टार प्रवाहवर

No comments:

Post a Comment