'लक्स झक्कास हिरोईन' चा शोध अंतिम टप्प्यात
लक्स
झक्कास हिरोईन चा शोध अंतिम टप्प्यात लाईटस… कॅमेरा…. या ३ शब्दात
सामावलेली सोनेरी दुनिया…. त्यात प्रवेश मिळवू पाहणारे अनेक होतकरू कलावंत
आणि यांना एकसंध जोडणारे निरनिराळे टेलेंट हंट. टेलेंट हंटस
आणि त्यातून प्रसिद्धीस येणाऱ्या तरुणाईच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ
मिळवून देणारी एक अनोखी स्पर्धा ९ एक्स झक्कास वाहिनीने आयोजित केली मराठी
इंडस्ट्रीला नवा सुंदर चेहरा देण्याच्या उद्देशाने लक्स झक्कास हिरोईन ही
आगळीवेगळी स्पर्धा गेले चार आठवडे चालवण्यात आली. या टेलेंट शो
मध्ये महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या १० जणींमध्ये हा किताब
जिंकण्याकरिता चुरशीची लढत खासच रंगली. सध्या 'लक्स झक्कास हिरोईन'चा
किताब आणि मिनाक्षी सागर प्रोडक्शन निर्मित आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत मितवा या आगामी मराठी सिनेमात झळकण्याची झक्कास संधी कोण पटकावतो याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अलीकडेच 'लक्स झक्कास हिरोईन' या टेलेंट शोचा
धमाकेदार ग्रांड फिनाले गोरेगावमधील स्टुडियो ८ मध्ये पार पडला असून
येत्या शनिवारी ३ मे ला ९ एक्स झक्कास वाहिनीवर दाखवला जाणार आहे.
निवडल्या
गेलेल्या तरुणींना प्रत्येक एपिसोडमधून अभिनय, नृत्य, गायन, फिटनेस या आणि
अशा अनेक पातळ्यांवर पारखण्यात आले. यावेळी उपस्थित नावाजलेल्या
परीक्षकांचे मार्गदर्शन या तरुणींना लाभले तसेच काहींच्या अभिनयाला दाद
देत आपल्या आगामी चित्रपटांत काम देऊ करण्याची अमूल्य संधीही
दिली. ग्रांड फिनालेला स्वप्नील जोशीने या दहा तरुणीसोबत बहारदार नृत्यही
सादर केले. उर्वरित ७ जणी मधून १ विजेती आणि १ उपविजेती निवडली जाणार असून
विजेत्या तरुणीला 'लक्स झक्कास हिरोईन' या किताबाखेरीज मितवा चित्रपटात
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. तर
उपविजेत्या तरुणीला दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या क्लासमेट या
आगामी चित्रपटात भूमिका देण्यात येणार आहे. सई ताम्हणकर आणि दिग्दर्शक
संजय जाधव हे यावेळी परिक्षक म्हणून उपस्थित होते तर दिग्दर्शिका स्वप्ना
वाघमारे-जोशी, आरजे शोनाली स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी यांच्यासमवेत
चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
७ तरुणींमध्ये चाललेली ही रोमांचक रस्सीखेच पाहण्यासारखी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर या स्पर्धक तरुणींनी उपस्थितांची नुसतीच मने जिंकली नाहीत तर आपल्या कलागुणांची दखल घ्यायला भाग पडले हे विशेष. या सोहळ्यादरम्यान झालेल्या गमती-जमती स्पर्धक तरुणींनी सादर केलेले परफॉरमन्स त्यावार परिक्षकांनी केलेल्या कमेंट्स आणि बहुप्रतीक्षित 'लक्स झक्कास हिरोईन' किताबाची मानकरी शनिवारी ३ मे ला ९ एक्स झक्कास वाहिनीवर रात्री ९. ०० वा. पाहता येणार आहे.
No comments:
Post a Comment