Monday, November 23, 2015

Kalidas Festival - Reinvent the Tradition – begins

http://www.hgsitebuilder.com/files/writeable/uploads/hostgator944363/image/mtdc-logo.gif
Mumbai: Winter in Nagpur brings fond memories of the world famous poet, as MTDC celebrates Kalidas Festival to memorize the great Sanskrit poet Kalidas and his fabulous work in the field of poetry.
The four days and three nights filled musical and dance extravaganza is organized by MTDC in association with Divisional Commissioner office. Kalidas Festival is also designed to promote the Vidarbha region and its rich legacy throughout India and across. The festival this year attracted many tourists from across the globe.
The Kalidas festival started in year 1996 is packed with stupendous performances of some of the most recognized artists in the field of dance, music and drama. Renowned artists like Veteran actress Hema Malini, Indian Santoor player, Pandit Shivkumar Sharma, Indian Classical dancer and Choreographer Sharmila Biswas, Kathak Maestro Pandit Birju Maharaj, Odissi dancer, Guru Kelucharan Mohapatra was an Indian classical dancer and more performed at Kalidas festival in past.   
Also many theatre artists get chance to show their luminous talent which adds glory to the festival. Budding artists get to showcase Maharashtra’s rich culture and heritage through their performances. The festival is celebrated at Ramtek where the festival is organized is a historic place citing its links to Lord Rama and Poet Kalidas. This is the place where Rama, Laxman and Sita are said to have ‘rested’ on their way to Vanvaas. Ramtek is also known for the place whose beauty and tranquillity inspired the great poet Kalidas to compose his famous poetry Meghdoot and is also a popular tourist destination in Maharashtra.
Paraag Jaiin Nainutia (IAS), Managing Director, MTDC said, “Kalidas festival has come up as a prestigious cultural event for Maharashtra, attracting not only domestic but also global tourists. This festival has been enriching Indian Literature and offering as mesmerising experience. This year’s festival will also offer a great treat to the people of Nagpur, and cultural lovers from India and abroad. The festival will help recall the golden era of Vidarbha region will certainly promote tourism in Maharashtra”.
Kalidas was a great Sanskrit poet and dramatist. Shakuntalam, a historical drama and Meghdoot, the epic poem are the finest masterpieces in terms of human literature. Other famous literary compositions of Kalidas are 'Abhijnanasakuntalam', 'Meghadootham', 'Raghuvamsam' and 'Kumarasambhavam'. The celebration of Kalidas Festival is a tribute to Kalidas and his eternal contribution to the field of poetry.

कालिदास महोत्सवपरंपरेचा पुनर्शोधआजपासून आरंभ
मुंबई: नागपूरमधील हिवाळ्यात जागतिक दर्जाच्या कवीच्या आठवणी ताज्या होतील, कारण एमटीडीसीने महान संस्कृत कवी कालिदास आणि त्यांच्या काव्य क्षेत्रातील अत्युत्तम कामगिरीच्या स्मरणार्थ कालिदास महोत्सवाचे आयोजन केले आहे.  
चार दिवस आणि तीन रात्री रंगारंग संगीत व नृत्याचा आविष्कार एमटीडीसीने विभागीय आयुक्तालयासोबत आयोजित केलेल्या या महोत्सवात अनुभवता येईल. विदर्भ विभागाचा प्रचार आणि हा समृद्ध वारसा भारत आणि त्यापलीकडे नेण्याच्या उद्देशाने कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी महोत्सवाने जगातील अनेक पर्यटकांना आकर्षित केले आहे.  
कालिदास महोत्सवाची सुरुवात 1996 मध्ये झाली आणि त्यामध्ये एकाहून एक सरस कलाविष्कार सादर होऊ लागले. नृत्य, संगीत आणि नाटक क्षेत्रातील काही नामांकीत कलाकारानी आपली कला या व्यासपीठावर पेश केली. या प्रसिद्ध कलाकारांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी, भारतीय संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, भारतीय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका शर्मिला बिस्वास, कथ्थक उस्ताद पंडित बिरजू महाराज, ओढीसी नृत्यांगना गृरू केलुचरण मोहपात्रा आणि अशा अनेक भारतीय नर्तकानी कालिदास महोत्सवात कला दाखवली आहे.
तसेच अनेक थिएटर आर्टीस्टना आपली चमकदार प्रतिभा मांडता आल्याने महोत्सवाला एक वेगळाच नूर प्राप्त झाला. उदयोन्मुख कलाकारांना महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वारसा आपल्या कलेतून सादर करण्याची संधी मिळाली. हा महोत्सव रामटेक येथे साजरा होत असून या ऐतिहासिक जागेचा संबंध भगवान श्रीराम आणि महाकवी कालिदास यांच्याशी आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे वनवासादरम्यान राम, लक्ष्मण आणि सीतेला ‘विश्रांती’ घेण्यास सांगण्यात आले होते. रामटेक या जागेचे सौंदर्य आणि शांततेने महाकवी कालिदासांच्या लेखणीला प्रोत्साहीत केले. त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी मेघदूतसारखे महाकाव्य लिहिले. हे ठिकाण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.  
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन- नैनुटिया (आयएएस) म्हणाले की, “कालिदास महोत्सव हा महाराष्ट्रासाठी मानाचा उत्सव आहे. त्यामुळे केवळ स्थानिक पर्यटक आकर्षित होत नाही तर परदेशी पर्यटकही आपल्याकडे येतात. या महोत्सवामुळे भारतीय साहित्याला समृद्ध केले आहे आणि अविस्मरणीय अनुभव मिळतो. यावर्षीच्या महोत्सवात नागपूरवासीय, भारत आणि परदेशी संस्कृतीप्रेमी  मंत्रमुग्ध होतील. हा महोत्सवामुळे विदर्भाचे सोनेरी युग उलगडायला मदत होईल ज्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाचा प्रचार होण्यास मदत मिळेल.”  
कालिदास हे महान संस्कृत कवी आणि नाटककार होते. त्यांनी शाकुंतलम हे ऐतिहासिक नाटक मेघदूत हे महाकाव्य लिहिले. त्यांचे साहित्य मानवी साहित्यातील उत्तम कलाकृती ठरले. त्याशिवाय ‘अभिजननसकुंतलम’, ‘मेघदूतम’, ‘रघुवंशम’ आणि ‘कुमारसंभवम’ यासारख्या प्रसिद्ध साहित्याची निर्मिती केली. कालिदास महोत्सव म्हणजे त्यांना आणि त्यांच्या काव्य क्षेत्रातील अभिजात कामगिरीला अभिवादन आहे.


No comments:

Post a Comment