Monday, April 6, 2015

सतीश राजवाडेंची भाईगिरीदिग्दर्शनामध्ये आपलं नाणं  खणखणीत वाजवल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे अभिनयातही आपली चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'टाईम बरा वाईट' या सिनेमात  सतीश राजवाडे एका आगळ्या वेगळ्या हटके भूमिकेत दिसणार आहेत. सतीश राजवाडे यांची ही भूमिका त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या चित्रपटात सतीश राजवाडे चक्क भाईगिरी करताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना सतीश राजवाडे म्हणाले  की, मला स्वतःला  ही भूमिका करायला मजा आली. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास ही सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला.  

आयुष्यात 'वेळकधीचकुणासाठी थांबत नाहीआजच्या धावपळीच्या जगण्यात वेळेचं महत्त्व आपणजाणतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही वेळ केव्हा चांगली असते तर केव्हा वाईट, याच कथाबीजावर बेतलेला'टाईम बरा - वाईटहा नवा थ्रिलर अॅक्शनपट येतोयअनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध संकलक राहुलभातणकर 'टाईम बरा - वाईट'  चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करताहेत 

नेहमीच्या परिघाबाहेर वेगळा कथाविषय प्रेक्षकांना 'टाईम बरा - वाईटसिनेमात पहाता येणार असून मराठीतीलअनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेतयात सतीश राजवाडेआनंद इंगळेऋषिकेश जोशीभूषण प्रधान,निधी ओझासिद्धार्थ बोडकेसुनील पेंडुरकरनुपूर दुधवडकरराजेश भोसलेप्रणव रावराणे आदी कलाकारांच्याभूमिका आहेत. 'वीआरजीमोशन पिक्चर्स प्रालि.' निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे यांनी 'टाईम बरा वाईट' चित्रपटाची निर्मिती केली असून सह निर्माता बाहुल आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment