मुंबई, ३० मार्च: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये फ्युएल' (Friends Union for Energising Lives) संस्थेचा सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) प्लॅटफॉर्मवरील सूचीकरणाचा (Listing) 'बेल रिंगिंग' सोहळा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान, फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे आणि कॅपजेमिनीचे अनुराग प्रताप उपस्थित होते.
या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
४० मुलींसाठी फ्यूल च्या 'कमवा आणि शिका' या क्रांतिकारी उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून शासनातर्फे महाराष्टातील विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल यांच्यातील ही भागीदारी महाराष्ट्रातील गरजू मुलींसाठी मोफत शिक्षणाची दारे उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा मिळाल्यावर ते स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करतात. आम्ही कौशल्य आणि शिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यात फ्यूल स्किल टेक यूनिवर्सिटीच्या सहाय्याने हजारो कोशल्याने परिपूर्ण विद्यार्थी तयार होतील.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फ्युएलचे कौतुक करताना सांगितले की कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील मार्गदर्शक म्हणून फ्युएल स्किल्स टेक यूनिवर्सिटी नावारूपाला येईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फ्यूल आता स्किल टेक यूनिवर्सिटी म्हणून सुरू होईल. आजच्या एनएसई लिस्टिंगमुळे मुलीच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.
आशिष कुमार चौहान यांनी सांगितले की, फ्युएलने एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे ९९ लाख रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. सामाजिक गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणावर भर देताना त्यांनी नमूद केले की, या निधीपैकी ३७% वाटा किरकोळ देणगीदारांचा (Retail Donors) आहे. एनएसई प्लॅटफॉर्म आता देशातील ९९.८५% पिन कोडपर्यंत पोहोचला असून सामान्य नागरिकांनाही सामाजिक बदलात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.
फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या फ्युएलच्या प्रवासापासून ते आता स्किल टेक युनिव्हर्सिटी होण्यापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी सेंजेटटा आणि Global Capability Centers (GCC) सोबत नवीन धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. भविष्यात शंभर कोटी चा इशू आणणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचे ध्येय आहे.
मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment