Monday, April 4, 2022

प्रेमाचा अनुबंध उलगडणारा ‘फ्लिकर’



आशयपूर्ण कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक हे कुठल्याही चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचं. अनोख्या शीर्षकांच्या चित्रपटांसाठी मराठीसृष्टी ओळखली जाते. असचं हटके टायटल आणि प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा ‘फ्लिकर’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मणीगंडन मंजुनाथन प्रस्तुत आणि ‘राजसरकार फिल्म्स’ व ‘पोस्टमन फिल्म्स’ निर्मित या चित्रपटातून प्रेमाचा खरा अर्थ दाखवतानाच नात्याचा परामर्श घेतला जाणार आहे. नुसरत शानुर मुजावर, मणीगंडन मंजुनाथन, प्रेमराणी मंजुनाथन यांनी निर्मीतीची जबाबदारी सांभाळली असून सहनिर्मीती राहुल पाटील यांची आहे. अमोल पाडावे यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.

ये इश्क नही आसान असं म्हणतात. प्रेम ही अशी एक भावना आहेजी सर्वांच्याच मनात अपरिहार्यतेने उपजते. आयुष्यात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात पडतोच. अशक्य नसलेले शक्य करून दाखवण्याची ताकद प्रेमात असते. हे दाखवून देणारा सत्यघटनेवर आधारित ‘फ्लिकर हा चित्रपट प्रेमाची खरी अनुभूती प्रेक्षकांना देईल असा विश्वास निर्माते व्यक्त करतात.

‘फ्लिकर चित्रपटाच्या माध्यमातून राजवीर सरकार तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदेसंजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकरपूजा पवारअरुण कदमगौरव रोकडेमनिषा केळकरमौसमी तोंडवळकरपूर्णिमा अहिरे, सायली जाधवप्रतीक्षा शिर्के, किशोर नांदलस्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.

चित्रपटाची पटकथा-संवाद जय अत्रे, मंदार चोळकर, अमोल पाडावे, समीर सामंत यांनी लिहिले आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना शान, बेनी दयाल, मोहम्मद इरफान या हिंदीतील गायकांनी स्वरसाज दिला आहे. या चित्रपटाचे छायांकन उदयसिंग मोहिते तर संकलन आशीष म्हात्रे यांनी केले आहे. महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी संदीप काळे यांच्याकडे आहे. प्रशांत राणे हे कला दिग्दर्शक आहेत.  निर्मिति प्रबंधक गुनाशेखरन तंघवेल आहेत.

फ्लिकरची प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

No comments:

Post a Comment