Wednesday, January 15, 2020

वर्ष २० च्या तिसर्‍या तिमाहीत घरांच्या विक्रीत ३० टक्क्यांची घसरण, नवीन प्रकल्पांमध्ये ४४ टक्क्यांची घट : प्रॉपटायगर रिपोर्ट‍


   
नवी दिल्ली, १३ जानेवारी २०२०-  ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या  कालावधीत वार्षिक तुलनेत नवीन प्रकल्पांच्या सुरूवातीत ४४ टक्क्यांची घट दिसून आली असून ही घट विशेष करून द्रव्यतेच्या कमतरते मुळे झाल्याचा निष्कर्श प्रॉपटायगर.कॉम सह हाऊसिंग.कॉम आणि मकान.कॉम चे अधिकार असलेल्या इलारा टेक्नॉलॉजीज च्या कंपनी ने आपल्या रिपोर्ट नुसार काढण्यात आला आहे.
प्रॉपटायगर डेटा लॅब्ज द्वारे जारी करण्यात आलेल्या ‘रिअल इन्साईट क्यू३एफवाय२०’ या भारतातील नऊ महत्त्वपूर्ण अशा प्रॉपर्टी बाजारपेठेच्या संशोधनातून असे पुढे आले आहे की एनबीएफसी क्षेत्राशी संबंधित चिंते मुळे घरांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो कारण रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासक हे अधिकतर त्यांच्या आर्थिक गरजांसाठी या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.  म्हणूनच विकासकांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे नवीन प्रकल्पांच्या सुरूवातीवर याचा परिणाम होतांना दिसून आला आहे.
“ सरकार कडून क्षेत्रासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या उपाययोजनांचा खूपच कमी प्रमाणात परिणाम होतांना आपल्याला दिसून येतो. एकंदरीत देशाच्या जीडीपी मध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण योगदान आहे, जुलै-सप्टेंबर या कालावधीत या क्षेत्राने ४.५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती, आम्ही सरकारकडून आणखी सहकार्याची अपेक्षा करतो ज्यामुळे खरेदीदार हे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक वाढवतील.  १ फेब्रुवारी रोजी घोषित होणार्‍या केंद्रिय अर्थसंकल्पाकडून आंम्हाला अपेक्षा आहे की माननीय अर्थमंत्री अशा काही घोषणा करतील ज्यांमुळे लोकांच्या बचतीत वाढ होईल जेणेकरून ते मालमत्ता खरेदीकडे वळू लागतील.” असे हाऊसिंग.कॉम, मकान.कॉम आणि प्रॉपटायगर.कॉम या देशातील एकमात्र संपूर्णत: रिअल इस्टेट टेक्नॉलॉजी मंचाचे अधिकार असलेल्या इलारा टेक्नॉलॉजीज चे ग्रुप सीईओ ध्रुव अगरवाला यांनी सांगितले.
विविध शहरांमधील विक्रीत घट-
भारतातील नऊ महत्त्वपूर्ण शहरांमधील घरांच्या विक्रीत वर्षाच्या ऑक्टोबर-‍ डिसेंबर या तिमाहीत ३० टक्क्यांची वार्षिक घट झाली आहे.  ही घट सरकारने खरेदीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाय करूनही झालेली नाही. गेल्या वर्षीच्या या तिमाहीत ९१,४६४ घरांची विक्री झाली होती तर यावर्षीच्या  तिसर्‍या  तिमाहीत ही आकडेवारी ६४,०३४ इतकी आहे.
एकूण विक्रीच्या जवळजवळ ४० टक्के ‍विक्री ही मुंबईत झाली.
यांतून असे दिसून येते की राष्ट्रीय स्तरावर विक्री सर्व बाजारपेठांत कमी झाली,  भारताची सिलिकॉन व्हॅली असलेल्या बंगळूरू मधूनही घर विक्रीत ५० टक्क्यांची घट दिसून आली.
ज्यावेळी नऊ महिन्यांची तुलना केली गेली तेंव्हा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विक्रीत १३टक्क्यांची घट झालेली दिसून येते.  गेल्या वर्षी२६३,२९४ घरांची विक्री झाली तर या वर्षी केवळ २२८,२२० घरांची विक्री झाली.

शहर
२०१८
२०१९
वर्ष १९ ची तिसरी ‍तिमाही
वर्ष १९ ची चौथी तिमाही
वर्ष २० ची पहिली तिमाही
वर्ष २० ची दुसरी तिमाही
वर्ष२० ची तिसरी ‍तिमाही
अहमदाबाद
,९६०
,४१४
,४७९
,५७८
,११८
बंगलोर
१०,२९९
१०,०९२
,६००
,४२५
,१५५
चेन्नई
,४६७
,६०५
,५७१
,७७२
,०१५
गुरगांव
,०६९
,९७०
,८८०
,५८१
,८३४
हैद्राबाद
,८६९
,८५७
,७२३
,००२
,३७२
कोलकाता
,८१०
,३४१
,३३३
,०५२
,५६६
मुंबई
३०,८५०
२७,५२७
२८,७२६
२४,८८२
२५,१९८
नोएडा
,५५६
,१४८
,६२७
,०३८
,८३०
पुणे
१९,५८४
१७,९११
१८,०३४
१५,८८३
११,९४६
एकूण
९१,४६४
९०,८६५
८८,९७३
७५,२१३
६४,०३४

साठ्यात १२ टक्क्यांची घट
ग्राहकांनी नेहमीच तयार घरांना प्राधान्य दिल्यामुळे साठ्यात लक्षणीय म्हणजेच १२ टक्क्यांची घट या तिमाहीत दिसून आली.  ८.८३ लाख न विकल्या गेलेल्या घरांची संख्या या कालावधीत होती,  न विकल्या गेलेल्या साठ्यात घट होऊन ती वर्ष २० च्या तिसर्‍या तिमाहीत ७.७५ लाखांवर पोहोचली.  मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक न विकलेली घरे म्हणजे एकूण संख्येच्या ५७ टक्के घरे आहेत.  त्या बरोबर विकल्या न गेलेल्या घरांपैकी निम्याहून अधिक घरे ही परवडणारी घरे (४५ लाखांपेक्षा कमी किंमतीतील घरे) आहेत.

सध्याच्या गतीने विक्री सुरू राहिल्यास व्यावसायिकांना ही सर्व घरे विकण्यासाठी २९ महिन्यांचा कालावधी लागेल.

न विकली गेलेली घरे
शहर
डिसें/२०१८
मार्च २०१९
जून २०१९
सप्टेंबर २०१९
डिसें/२०१९
अहमदाबाद
६०,०१५
५७,२२०
५२,२९४
५०,६९०
४८,३६७
बंगलोर
८६,३३५
८३,४४७
८०,५२०
७९,०४६
७९,४९६
चेन्नई
३६,६४२
३७,३४४
३५,३८४
३३,३०४
३३,६९४
गुरगांव
४६,३६४
४४,४६९
४४,५२२
४४,१९९
४२,०७१
हैद्राबाद
४२,१४०
४१,५०९
३८,३४९
३५,२१६
३३,२२७
कोलकाता
४६,३६४
४४,८६१
४२,०४०
४०,०२९
३७,९७९
मुंबई
३३८,८९४
३२८,०५२
३१७,२५३
३०५,०१८
२९६,४६५
नोएडा
६७,९९१
६५,५७७
६३,८४७
६१,५४५
५९,२६१
पुणे
१५८,७३८
१५५,६७९
१५१,८४२
१४८,६७६
१४४,३००
एकूण
८८३,४८३
८५८,१५८
८२६,०५१
७९७,७२३
७७४,८६०
 कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये ५ लाखांहून अधिक घरे तयार झाली आहेत     
एकूण ५.३३ लाख घरांचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष २०१९ मध्ये ही घरे ताबा देण्यासाठी तयार झाली होती आणि वर्ष२०२० या कॅलेंडर वर्षांत ५.४५ लाख घरे ही बांधून तयार होण्याची अपेक्षा आहे.  
कोलकाता, गुरगांव मध्ये नवीन सुरूवातीत घट
वर्ष २० च्या तिसर्‍या तिमाहीत केवळ ४१,१३३ नवीन प्रकल्पांची सुरूवात झाली होती तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ७३,२२६ घरांची सुरूवात करण्यात आली होती. सर्व नऊ बाजारपेठांमध्ये नवीन सुरूवाती कमी झाल्या तर कोलकाता आणि गुरूग्राम मध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ७९ आणि ७४ टक्क्यांची घट दिसून आली.
रिपोर्ट नुसार असे दिसून येते की जवळजवळ ४० टक्के नवीन प्रकल्पांची सुरूवात ही मुंबईची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आसपास झाली आहे.
या विभागात परवडणार्‍या घरांनी बाजी मारली व या विभागात ५२ टक्के नवीन प्रकल्पांची सुरूवात करण्यात आली.
या आर्थिक वर्षांतील नऊ महिन्यांची तुलना केल्यास नवीन प्रकल्पांमध्ये ३२ टक्क्यांची घट ही मागील वर्षांतील याच कालावधी पेक्षा होतांना दिसते.  गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान २१५,५९६ नवीन घरांची सुरूवात करण्यात आली होती तर या वर्षीच्या याच कालावधीत ही आकडेवारी १४५,८५२ घरे इतकी झाली.
विविध शहरांमधील किंमतीत किंचीत वाढ, हैद्राबाद मध्ये १३ टक्क्यांची वाढ
वर्षांच्या तुलनेत हैद्राबाद मध्ये किंमतीत १३ टक्क्यांची वाढ झाली,  या रिपोर्ट नुसार ही वाढ सर्व शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.  तर गुरूग्राम आणि अहमदाबाद मध्ये ही वाढ अनुक्रमे ६ आणि ५ टक्क्यांची आहे. अन्य शहरांत अगदी थोडी म्हणजे अगदी एक ते तीन टक्के इतकी वाढ दिसून आली.
(या सर्वेक्षणात सामील करण्यात आलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, बंगळूरू, चेन्नई, गुरूग्राम (भिवाड, धुरेहरा आणि सोन्हा सह), हैद्राबाद, कोलकाता, मुंबई (नवी मुंबई आणि ठाण्यासह), पुणे आणि नॉयडा (ग्रेटर नॉयडा आणि यमुना एक्सप्रेसवे सह) यांचा समावेश होता.)


No comments:

Post a Comment