Saturday, January 11, 2020

सुनिधी चौहान यांच्या हस्ते ‘रहस्य’ चित्रपटाचे ट्रेलर व संगीत अनावरण


रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. न दिसणाऱ्या जाणीवेपलीकडच्या गूढतेचा शोध घेताना अनेक अकल्पित, अघटित घटनांची मालिका निर्माण होत असते. भयवास्तव आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अशाच एका अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ येत्या ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहात उलगडणार आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन भावेश पाटील यांनी केले आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत आणि ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच बॉलीवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या हस्ते संपन्न झाला.
मराठीत गायला मला खूप आवडते. संगीतकार प्रेम कोतवाल सोबत या आधी मी रिअॅलिटी शो मध्ये काम केलं आहे. ‘रहस्य’ चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र काम करू शकलो याचा आनंद आहे, तर चित्रपटातील गाणं गातानाचा अनुभव खूप मस्त होता असं सांगत त्यांनी ‘रहस्य’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील यांनी यावेळी व्यक्त  केला.
चित्रपटाच्या प्रसंगाला अनुरूप चार वेगवेगळी गाणी यात आहेत. गायक सुनिधी चौहानआदर्श शिंदेप्रेम कोतवालयामिनी चव्हाण या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. ‘कसले हे रहस्य’ हे टायटल सॉंग सुनिधी चौहान यांनी गायले आहे. प्रेम कोतवाल यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे.
रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं सत्य हा ‘भावेश प्रोडक्शन्स’ निर्मित रहस्य या चित्रपटाचा गाभा आहे. लकी बडगुजरराकेश बागुलस्वाती पाटीलऋतुजा सोनारस्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे. चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकरतर संकलन भावेश पाटील यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित व मंदार पंडित यांचे आहे. डॉ. माधुरी वडाळकरदिनेश पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून गिरीश सूर्यवंशी कार्यकारी निर्माते आहेत. ऋतूध्वज देशपांडे यांनी चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. निर्मिती व्यवस्थापक विजय माळी आहेत. डॉ. अजय फुटाणे या चित्रपटाचे वितरक आहेत.
७ फेब्रुवारीला ‘रहस्य’ प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment