Monday, November 25, 2019

'फत्तेशिकस्त'च्या टीमची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला भेट



मराठी सिनेसृष्टीत सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला 'फत्तेशिकस्त' हा मराठी सिनेमा सिनेमागृहांमध्ये यशस्वी घोडदौड करत आहे. सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरत असलेल्या या चित्रपटाची टीम प्रदर्शनानंतरही तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचून प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. याचाच एक भाग म्हणून 'फत्तेशिकस्त'च्या टीमने सान्वी प्रोडक्शन हाऊसच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'गलती से मिस्टेकया नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगाला हजेरी लावली.

 या सोबतच या प्रसंगी भरवण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांच्या प्रदर्शनालाही 'फत्तेशिकस्त'च्या टीमने भेट दिली. 'फत्तेशिकस्त' च्या टीमसाठी या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकर, विक्रम गायकवाड, अंकीत मोहन आणि रुची सावर्ण यांनी शस्त्रे आणि नाण्यांविषयीची माहिती जाणून घेतली. 'गलती से मिस्टेकया नाटकाच्या प्रयोगापूर्वी 'फत्तेशिकस्त'चे प्रमोशन करत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करत ही कलाकृती सादर करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्याबद्दलची भावना रसिकांसमोर व्यक्त केली. या टीममध्ये 'फत्तेशिकस्त'चे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकरछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे चिन्मय मांडलेकरविक्रम गायकवाड अंकीत मोहन आणि रुची सावर्ण सहभागी होते.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीदुर्गराजरायगड आणि सान्वी एन्टरटेन्मेंट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment