Friday, September 20, 2019

पूर्व भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी एशियन पेंट्सची महिंद्रा लॉजिस्टिकशी भागिदारी17 सप्टेंबर 2019 – भारतातील आघाडीची पेंट कंपनी एशियन पेंट्स लि.ने (एपीएल) महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या थ्रीपीएल सोल्यूशन्स पुरवठादार कंपनीशी भागिदारी केली असून त्यामागे पूर्व भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्याचा कंपनीचा मानस आहे.
एमएलएल डंकुनी, हुगलीपश्चिम बंगाल येथील एक लाख चौरस फुटांचे रिजनल डिस्ट्रीब्युशन सेंटर (आरडीसी) आणि या आरडीसीमधील वितरणाचा पहिला टप्पा हाताळणार आहे. एमएलएलच्या सेवांना वाहतूक व्यवस्थापन आणि वेयरहाउस व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा पाठिंबा लाभेल.
एमएलएलकडे एफएमसीजीफार्माई- कॉमर्स तसेच वाहतूक उद्योगातील पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी खास तयार केलेल्या व सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याचे कौशल्य आहे. या भागिदारीमुळे पूर्व आणि ईशान्य भागातील ग्राहकांसाठीच्या लॉजिस्टिक्स सेवा सुधारतील.
महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पिरोजशॉ सरकारी म्हणाले, पुरवठा साखळी क्षेत्रातील एशियन पेंट्सची उच्च दर्जाची पत या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. त्यांच्याशी भागिदारी करण्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्स ही तंत्रज्ञानाधिष्ठितलॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार कंपनी असून वाहतूक तसेच गोदांमाचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. एशियन पेंट्सबरोबरचे आमचे गेल्या कित्येक वर्षांपासून असलेले नाते लक्षात घेता हे विस्तारित काम त्यांच्या पुरवठा साखळीमध्ये मूल्य समाविष्ट करेल व त्यांना अपेक्षित प्रभावीपणा आणि कार्यक्षमता मिळवण्यास मदत करेल.
महिंद्रा लॉजिस्टिक्सबद्दल
महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल) ही महिंद्राची पोर्टफोलिओ कंपनी असून ती 20.7 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा 1 अब्ज खासगी इक्विटी विभाग आहे. एमएलएल ही थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सेवा पुरवठादार असून पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवा तिचे कौशल्य आहेत. एक दशकापूर्वी स्थापन झालेली एमएलएल वाहनअभियांत्रिकीग्राहक उत्पादने आणि ई- कॉमर्ससारख्या क्षेत्रातील 400 कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते. कंपनीने असेट- लाइट हे व्यावसायिक प्रारूप अवलंबले असून त्याद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवेशी संबंधित गरजेनुसार आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवल्या जातात.
अधिक माहितीसाठी भेट द्या  www.mahindralogistics.com
महिंद्रा पार्टनर्स
महिंद्रा पार्टनर्स हा महिंद्रा समूहाचा 1 अब्ज डॉलर्सचा इनक्युबेशनखासगी इक्विटीसाहसी वित्त विभाग आहे. उदयोन्मुख व्यवसायांचा वैविध्यपूर्ण जागतिक पोर्टफोलिओ तयार करून त्याद्वारे मूल्यनिर्मितीला चालना देण्याचे ध्येय या विभागाने ठेवले आहे. याच्या पोर्टफोलिओमध्ये लॉजिस्टिक्सस्टील प्रक्रियाअक्षय उर्जाकन्व्हेयर यंत्रणारिटेलमूलभत सुविधा सल्ला आणि कौशल्य उभारणीलक्झरी बोट उत्पादन व मीडिया अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. या विभागाने आयओटी आणि शेयर्ड मोबिलिटी क्षेत्रात गुंतवणूक करत नुकतेच आपले कामकाज अमेरिकेत विस्तारले आहे.
अधिक माहितीसाठी www.mahindrapartners.com
महिंद्राबद्दल
20.7 अब्ज डॉलर्स फेडरेशन कंपन्यांचा महिंद्रा समूह लोकांना नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स देतग्रामीण समृद्धी वाढवण्यासाठीशहरी जीवनशैली व व्यवसायातील कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा समूह ट्रॅक्टर्सयुटिलिटी व्हेअकल्समाहिती तंत्रज्ञानआर्थिक सेवा आणि व्हेकेशन ओनरशीप या क्षेत्रांत आघाडीवर असून आकडेवारीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. त्याशिवाय शेती व्यवसायकंपोनंट्सव्यावसायिक वाहनेसल्लासेवाउर्जाऔद्योगिक उपकरणेलॉजिस्टिक्सस्थावर मालमत्तास्टीलएयरोस्पेस आणि संरक्षण व दुचाकी व्यवसायात कंपनीचे स्थान मजबूत आहे. भारतात मुख्यालय असलेल्या महिंद्रा समूहाचे 100 देशांत 2,40,000 लोक कार्यरत आहेत.
महिंद्राबद्दल अधिक माहितीसाठी - www.mahindra.com  ट्विटर आणि फेसबुक - @MahindraRise

No comments:

Post a Comment