Tuesday, June 4, 2019

गावामध्ये ऍप आधारित टॅक्सी सेवा रोखण्याचा अधिकार पंचायतीला नाही – गोवामाइल्सपणजी,  2 जून – आज प्रसारित करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये जीटीडीसीचा उपक्रम असलेल्या गोवामाइल्स या ऍप आधारितटॅक्सी सेवेने अंजुनाकेसुआ भागातील गाव पंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात टॅक्सी सेवा रोखण्याचा केलेला प्रयत्न बेकायदेशीर असल्याचेठामपणे सांगितले आहे.
हे प्रेस स्टेमेंट रविवार  जून २०१९ रोजी अंजुनाकेसुआ पंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या विशेष ग्राम सभेच्या उद्देशाला विरोधकरण्यासंदर्भात असून त्यांचा उद्देश टॅक्सी व्यवसायाला धोका निर्माण करणारा आहे.
आपल्या व्यवसायाला गोवा सरकारचा पाठिंबा असल्याचा आणि या व्यवसायामुळे गावातील शेकडो टॅक्सी मालक/चालकांना रोजगारमिळत असल्याचा पुनरूच्चार गोवामाइल्सने केला आहे.
गोवामाइल्स ही गोवा टुरिझमची ऍपवर आधारित टॅक्सी सेवा असून गोवा राज्यातील पर्यटक तसेच स्थानिकांना परवडणारी वाहतूक सेवापुरवणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे आज जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही काळात बरेच लोक त्यांच्या हितासाठी या उपक्रमाविरोधात काम करत असून गोवामाइल्स सेवेचा भाग असलेले टॅक्सी मालक/चालकांना खूप त्रास देत असल्याची खंत गोवामाइल्सने व्यक्त केली आहे.
गोवामाइल्सचे प्रवक्ते श्रीजस्टिस नुन्स यांच्या मते ही ऍप आधारित टॅक्सी सेवा तीन मुख्य तत्वांनुसार चालते – चालकाच्या खिशातूनकमिशन घ्यायचे नाहीघाईच्या वेळांमध्ये प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क घ्यायचे नाही आणि दिवसाचे शुल्क निश्चित राहाणारे असूनकेवळ रात्रीच्या शुल्कात ३५ टक्के वाढ असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार अंजुनाकेसुआच्या गाव पंचायतीने राज्यातील गोवामाइल्स या ऍपआधारित टॅक्सी सेवेविरोधात ठराव संमतकरण्यासाठी विशेष ग्राम सभेचे आयोजन केले आहे.
कायद्याविरोधात तसेच गाव पंचायतीच्या मर्यादेबाहेर असलेल्या या कामगिरीवर गोवामाइल्सने कडाडून टीका केली आहे.
या हालचालींमुळे या ऍपवर आधारित सेवेशी जोडल्या गेलेल्या गावातील शेकडो कुटुंबाचे आणि आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्यांचेतीव्र नुकसान होईल असेही गोवामाइल्सने नमूद केले आहेश्रीनुन्स यांच्या मते टीटीएजीने दाखल झालेल्या रिट याचिकेनुसार (रिटयाचिका क्रमांक ४६८ ऑफ २००५पंचायतीस उपस्थित असलेल्या ज्ञात वकीलाने अशी विनंती केली की पंचायत कोणत्याही प्रकारे याचिकाकर्त्यांच्या व्यवसायावर किंवा प्रतिवादी क्रमांक ७ वर नियंत्रण ठेवणार नाही. भारतीय संविधानाच्या आर्टिकल १९ अंतर्गतनमूद करण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधात आणि त्यांच्या संबंधित मूलभूत अधिकारांनुसार, अपवादात्मक स्थितीत पंचायतीच्या हितसंबंधानुसार नियमित करण्यासाठी करता येईल. हे स्पष्ट करण्यात आले आहे, की याचिकाकर्त्यांच्या (टीटीएजी) व्यवसायावर बंधने घालण्याचा तसेच पंचायत आणि प्रतिवादी क्रमांक ७ ला त्यांच्यापैकी कोणाही एकाच्या हितासाठीमक्तेदारी तयार करणारा ठराव मांडण्याचा अधिकार नाही व पर्यायाने जे व्यवसायात कार्यरत आहेत त्यांना सार्वजनिक हितासाठी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये प्रवेश व निर्गमन नियमित करता येईल.

कायदेशीर बाबी स्पष्ट आहेतऍप आधारित टॅक्सी मालक आणि चालकही गाव पंचायतीचा भाग आहेत  पंचायतीने संमत केलेला ठरावत्यांच्या व्यवसायाचेही नुकसान करणारा आहे, असेही श्री नुन्स म्हणाले.
गोवामाइल्स हा अधिकृत व्यवसाय उपक्रम गोवा पर्यटन विकास महामंडळाने तयार आणि विकसित केला आहेहा उपक्रम प्रामुख्यानेगोवा टॅक्सी चालक आणि गोव्याला भेट देणारे पर्यटक तसेच भागधारकांच्या हितासाठी तयार करण्यात आला आहेआम्हाला असे वाटतेकी या यशस्वी संकल्पनेबाबत काही स्थानिक टॅक्सी चालकांनी स्वहिताला प्राधान्य देणाऱ्या काही इतरांमुळे गैरसमज करून घेतला आहे.


No comments:

Post a Comment