Thursday, January 31, 2019

'व्हेअर इज माय कन्नडका' सिनेमातून अभिनेत्री पत्रलेखाचे कानडी सिनेमात पदार्पण


- गोल्डन गणेशसोबत चमकणार 
- राज आणि दामिनी या जोडीचे दिग्दर्शन 
 
हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली हिंदी सिनेमात पदार्पण केल्यानंतर, आता अभिनेत्री पत्रलेखा पॉल कानडी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'व्हेअर इज माय कन्नडका' या ऍक्शन कॉमेडीपटात ती लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनचे असतील. कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्रि-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये संपूर्णतः शूट होणार आहे. यावर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतील. 

कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी पत्रलेखाच्या या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 
'हा माझा पहिला कानडी सिनेमा असून मी खूप उत्सुक आहे. सिनेमातील भूमिकेबद्दल मी आता फारसे काही बोलू शकत नसले तरी मी आजवर ऑनस्क्रीन असे काही काम केले नाहीय एवढे मात्र नक्की. त्यामुळे अर्थातच ही भूमिका माझ्यासाठी खास आहे' असे पत्रलेखा सांगते.

No comments:

Post a Comment