Friday, August 31, 2018

‘मनमर्जीया’मधील 'दर्या' गाण्याला लाखो रसिकांची पसंतीमुंबई,३० ऑगस्ट २०१८: शाहीद मल्ल्याचा सुमधुर आवाज हा अमित त्रिवेदीनी जो मूड संगीतबद्ध केला आहे त्याला अगदी साजेसा असा आहे. ‘मनमर्जीया’मधील मधुर 'दर्या' गाणे शाहीद मल्ल्या आणि अम्मी विर्क यांनी गायले असून शेलीचे अर्थपूर्ण बोल त्याला लाभले आहेत. त्यामुळे हे गाणे ज्यांना रोमँटिक गाणी आवडतात अशा प्रत्येक रसिकाच्या संग्रहामध्ये आपले स्थान मिळवेल. हे गाणे रुमी(तापसी पन्नू),रॉबी (अभिषेक बच्चन) आणि विकी (विकी कौशल) यांच्या नातेसंबंधामधील गुंतागुंत अधोरेखित करते. या गाण्यातून प्रेमाचा त्रिकोण समोर येतो. अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातील ही कथा आहे.

हिंदीतील गाणी ही पाश्चिमात्य चित्रपटांमधील गाणी आणि नृत्याच्या संस्कृतीतून आलेली असतात. आगामी ‘मनमर्जीया’ चित्रपटातील या गाण्यासाठी शाहीद मल्ल्याला खूप वाहवा मिळाली आहे. या 'दर्यागाण्याला केवळ दोनेक दिवसांत ३०लाखांहूनही अधिक हिट मिळाल्या असून हा एक दमदार पंजाबी प्रेमपोवाडा असल्याची पोचपावती त्याला मिळाली आहे.

शाहीद ने ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटातील ‘गुरबानी’ या गाण्यातून त्याने आपले चित्रपटातील पदार्पण केले. पण त्याला बॉलीवूड चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला तो पंकज कपूर यांचे पहिले दिग्दर्शन असलेल्या ‘मौसम’ या चित्रपटात. या चित्रपटाने ‘रब्बा’ आणि ‘इक तूही तूही’ या दोन सुपरहिट गाण्यांचे श्रेय त्याला मिळवून दिले. त्याने ‘हॅप्पी भाग जायेगी’ आणि ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ या चित्रपटांमध्येही लोकप्रिय ठरलेली गाणी गायली आहेत. इक तूही तुही-मौसम, दो धारी तलवार–मेरे ब्रदर कि दुल्हन, कुक्कड–स्टुडंट ऑफ द इयर, मन जागे सारी रात–बिट्टू बॉस, लव शव ते चिकन खुराना ही त्याची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत.

No comments:

Post a Comment