Thursday, June 23, 2016

‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’चा जल्लोष


 चित्रपट व नाटक विभागाची नामांकने जाहीर


मराठी चित्रपटांच्या आणि नाटकांच्या गौरवशाली इतिहासात विनोदी चित्रपटनाटक आणि विनोदी अभिनेते यांचे योगदान नेहमीच अत्यंत मोलाचे राहिले आहे. अनेक विनोदवीरांनी मराठी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे. ज्या विनोदाने मराठी नाटक आणि चित्रपटांचा काळ गाजवला त्या विनोदवीरांना सलाम करण्यासाठी झी टॉकीजने झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस पुरस्कार सोहळा आणला.

दरवर्षी हटके थीम घेऊन रंगणाऱ्या या सोहळ्याची यंदाची थीम आहे ‘कल आज और कल’...विनोदाची परंपरा पुढे नेणाऱ्या कलावंतांबद्दल आदर व्यक्त करताना रसिकांनाही मनोरंजनाची अभूतपूर्व पर्वणी देणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटनाटकप्रेक्षकांची पसंतीअशा विविध विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार असून, प्रेक्षकांना हसविण्यात आपले आयुष्यवेचणाऱ्या कलाकारांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ पुरस्कारांमध्ये यंदा चित्रपट विभागामध्ये  ‘पोश्टर गर्ल’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘संदूक’, ‘भो भो’, ‘बाय गो बाय’, ‘वॅान्टेड बायको नंबर १’, ‘वाजलाच पाहिजे गेम की शिणेमा’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘गुरु’ हे चित्रपट नामांकनाच्या शर्यतीत आहेत. तर नाटक विभागामध्ये ‘आता माझी सटकली’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कुछ मिठा हो जाये’, ‘आलाय मोठा शहाणा’,‘गेला उडत’ या नाटकांमध्ये चुरस आहे. यापैकी कोण बाजी मारणारयाविषयी उत्सुकता वाढली आहे.

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विनोदवीरांचा जल्लोष या पुरस्कार सोहळ्यात कसा रंगणार हे पाहणं उत्स्कुतेचं ठरणार आहे. 






नामांकने

चित्रपट विभाग  

सर्वोत्कृष्ट चित्रपट - ‘पोश्टर गर्ल’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘संदूक’, ‘भो भो’, ‘बाय गो बाय’, वॅान्टेड बायको नंबर १

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अतुल काळे (संदूक), राहुल जाधव (मर्डर मेस्त्री), विजय पाटकर (कॅरी ऑन देशपांडे), समीर पाटील (पोश्टरगर्ल), भरत गायकवाड (भो भो)

सर्वोत्कृष्ट लेखन- अतुल काळे, सुबोध खानोलकर, आशिष रायकर (संदूक), नेहा कामत, प्रशांत लोके (मर्डर मेस्त्री),  हेमंत एदलाबादकर (कॅरी ऑन देशपांडे), हेमंत ढोमे (पोश्टर गर्ल), विजय पगारे(बाय गो बाय)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुमीत राघवन(संदूक), भाऊ कदम (वाजलाच पाहिजे गेम की शिणेमा),पुष्कर क्षोत्री(कॅरी ऑन देशपांडे), हृषिकेश जोशी (पोश्टर गर्ल), प्रशांत दामले(भो भो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– विशाखा सुभेदार(दगडाबाईची चाळ), क्रांती रेडकर(मर्डर मेस्त्री),मानसी नाईक(कॅरी ऑन देशपांडे), उर्मिला कानिटकर (गुरु), सोनाली कुलकर्णी(पोश्टर गर्ल),

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ मेनन(पोस्टर गर्ल), संजय खापरे (कॅरी ऑन देशपांडे), संदीप पाठक (पोश्टर गर्ल), सयाजी शिंदे (वॅान्टेड बायको नंबर १),राजेश भोसले (वाजलाच पाहिजे गेम की शिणेमा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पौर्णिमा अहिरे (बाय गो बाय), मैथिली वारंग (वॅान्टेड बायको नंबर १), वंदना गुप्ते(मर्डर मेस्त्री), नेहा शितोळे(पोस्टर गर्ल), हेमलता बाणे(कॅरी ऑन देशपांडे)


नाटक विभाग-

सर्वोत्कृष्ट नाटक- ‘आता माझी सटकली’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कुछ मिठा हो जाये’, ‘आलाय मोठा शहाणा’,‘गेला उडत’

सर्वोत्कृष्ट संहिता - ‘आलाय मोठा शहाणा’ (वैभव परब), ‘कुछ मिठा हो जाये’( शिरीष लाटकर, गणेश पंडित, आशिष पाथरे, अभिजीत गुरु), ‘आता माझी सटकली’ (नितीन जो. केदारे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – पुरुषोत्तम बेर्डे (आता माझी सटकली),राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ), केदार शिंदे, (गेला उडत) गणेश पंडित (कुछ मिठा हो जाये) संतोष पवार (आलाय मोठा शहाणा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता -  आशिष पवार (आलाय मोठा शहाणा), सिद्धार्थ जाधव (गेला उडत), अरुण नलावडे(श्री बाई समर्थ), दिगंबर नाईक (आता माझी सटकली), प्रसाद गोताड(चेड्वाची इली वरात जावई घुसलो घरात)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– अपूर्वा नेमळेकर-देशपांडे(आलाय मोठा शहाणा),निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ), केतकी चितळे (कुछ मिठा हो जाये), पोर्णिमा तळवलकर(कुछ मिठा हो जाये), स्नेहा जोशी (चेड्वाची इली वरात जावई घुसलो घरात)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – समीर चौघुले (श्री बाई समर्थ), महेश कोकाटे (आलाय मोठा शहाणा), अभिजीत चव्हाण (कुछ मिठा हो जाये), सुरेश चव्हाण (आता माझी सटकली), उपेंद्र शेट्ये (आता माझी सटकली)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री वनिता खरात (श्री बाई समर्थ), कोमल सुतार (चेड्वाची इली वरात जावई घुसलो घरात), अर्चना निपाणकर (गेला उडत), मनीषा रागा (शोधा अकबर), श्वेता घरत बर्वे (गेला उडत)


No comments:

Post a Comment